सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे मांजरी गावातील कचरा प्रश्न पेटला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 02:01 PM2019-11-07T14:01:34+5:302019-11-07T14:04:16+5:30

विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर गावातील रस्तावरील कचरा ग्रामपंचायतीने उचललाच नाही..

The garbage issue front in the Manjari village | सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे मांजरी गावातील कचरा प्रश्न पेटला

सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे मांजरी गावातील कचरा प्रश्न पेटला

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक प्रभाव : सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांवर चिखलफेक

अमोल अवचिते - 
पुणे : मांजरी गावातील रस्त्यावरील कचरा अनेक दिवसांपासून उचलला गेला नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत कचरा वेळेत उचलत नसल्याने गावात चांगलेच राजकीय युद्ध पेटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे मांजरी गावाचा कचरा प्रश्न पेटला असल्याचे चित्र आहे. 
विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर गावातील रस्तावरील कचरा ग्रामपंचायतीने उचललाच नाही. गावातील मुख्य रस्त्यांवरील कचरा कुंडी भरून वाहू लागली आहे. कचऱ्याचे ढिग साचल्याने नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे वाहणाऱ्या पाण्यासोबत कचरादेखील वाहत जातो. कच्चे रस्ते त्यावर साचलेला कचरा आणि चिखल यामुळे बिकट अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहने चालवणे आणि चालत जाणेदेखील अवघड झाले आहे. कचºयाच्या वाढत्या साम्राज्यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरू शकते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. असे नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. 
ग्रामपंचायतीकडून शासनाच्या देखभाल जमिनीवर म्हणजेच गायरानावर एकूण सतरा एकर जागेपैकी सध्या साडेनऊ एकर जागेवर कचऱ्याचे डम्पिंग केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र कचरा वर्गीकरण करण्याची कोणतीही सुविधा येथे उपलब्ध नाही. उघड्यावरच गावातील एकत्रीत कचरा आणून टाकला जातो. काही प्रमाणात जागेवर खोदलेल्या खड्ड्यांमध्येच कचरा जिरवला जात आहे. 


कचरा वर्गीकरण केंद्रावर कचरा टाकण्यासाठी दोन रस्ते आहेत. त्यापैकी एक रस्ता लष्कराच्या हद्दीतून तर दुसरा रस्ता लोकवस्तीतून जातो. लष्करच्या हद्दीतून जाणारा रस्ता अधिकाऱ्यांनी अडवला आहे. तर लोकवस्तीतून जाणारा रस्ता अतिशय खराब असून रस्त्यावर १० ते १५ फूट काळी माती आहे. मुसळधार पावसामुळे चिखल झाला असून कचरा डेपोवर गाड्या जाणं शक्य नाही. त्यामुळेच कचरा टाकता आला नाही. पर्यायी गावातील कचरा उचलण्यात आला नाही. नैसर्गिक कारणांमुळेच अडचण निर्माण झाली आहे. असे ग्राम विकास अधिकारी अनिल कुंभार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
डम्पिंग केंद्रावर जाण्यासाठी ग्रामपंचायत रस्ता का बनवू शकत नाही? कचरा प्रश्न सोडविण्यास ग्रामपंचायत का उदासीन आहे? की राजकीय वादामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळाला जातोय? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होऊ लागले आहेत. 
.........
लष्कराकडून कचरा टाकण्यास विरोध होत आहे. तसेच दुसरा रस्ता पावसामुळे खराब झाला आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने कचºयाच्या गाड्या रुतून बसतात. त्यामुळे कचरा उचलण्यास उशीर झाला. आदर पूनावाला यांच्या सहकार्याने कचरा उचलला जात आहे. मागील ग्रामपंचायत सदस्य मंडळाने कचºयाचे नियोजन योग्य प्रकारे केले नव्हते. दहा ते पंधरा वर्षांत त्यांना हा प्रश्न सोडवता आला नाही. त्या तुलनेत आम्ही योग्य नियोजन करून कचरा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. येत्या आठ ते दहा महिन्यांत कचरा प्रश्न सोडविण्यात येईल. नैसर्गिक अडचणींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. - शिवराज घुले, सरपंच
.........
ग्रामपंचायत सत्ताधाºयांना कचरा प्रश्न हाताळता येत नाही. वैशाली बनकर महापौर असताना त्यांना विनंती करून उरुळी देवाची फुरसुंगी येथील कचरा डेपोवर महापालिकेला दरमहा दहा हजार रुपये भाडे देऊन गावातील कचरा टाकण्याची परवानगी घेतली होती. मात्र आताच्या सदस्य मंडळाने ते रद्द करून गावातच कचरा टाकण्यास सुरुवात केली. ज्या जागेवर कचरा टाकला जात आहे. त्याच्या शेजारी लष्कराची जमीन असल्याने लष्कराकडून कचरा टाकण्यास विरोध होत आहे. तसेच येथे जंगल असून झाडांना कचºयाला लागत असलेल्या आगीमुळे धोका निर्माण होऊ शकतो. ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळेच आज कचºयाचा प्रश्न चिघळला आहे. - दिलीप घुले, जिल्हा परिषद सदस्य
........
विधानसभा निवडणुकीनंतरच कसा कचºयाचा प्रश्न गंभीर झाला़? भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा पराभव झाल्यामुळेच ग्रामपंचायत सदस्य मंडळाने कचरा उचला नाही. कचºयाचा प्रश्न गंभीर करून सत्ताधारी नागरिकांवर रोष व्यक्त करत आहेत. राजकीय पराभवामुळेच नागरिकांना वेठीस धरले जात आहे. पावसाचे कारण पुढे करून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. विकासाकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रश्न सोडविला गेला नाही तर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात येईल.- अजिंक्य घुले, पंचायत समिती सदस्य 
.........
रस्ता खराब आहे, असे सांगितले जात 
आहे. तसेच पावसामुळे कचरा उचलणे शक्य होत नाही. अशी विविध कारणे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येत आहेत, हेच मोठे अपयश आहे. सत्ताधाºयांना अशी कारणे सांगणे शोभत नाही. अपयश मान्य करून कचºयाचा गंभीर प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. ग्रामपंचायत सदस्य मंडळच या प्रकाराला जबाबदार असून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. यामध्ये राजकारण मध्ये न आणता प्रश्न सोडवण्यात यावा.- नीलेश घुले
...............
रस्त्यावर साठलेल्या कचºयाच्या ढिगाºयामुळे आरोग्य प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने कचरा वेळेत उचलावा. तसेच कचरा पेट्या मोठ्या आकाराच्या ठेवल्या तर रस्त्यावर कचरा पडणार नाही. कचरा गाड्या घरोघरी आल्या तर रस्त्यावर पडणाºया कचºयाचे प्रमाण कमी होईल. - रंजना घुले, रहिवाशी.
................
कचºयाचे ढीग साचल्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे. डास, चिलटांचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने कचरा वेळेत उचलावा - बबलू सिद्धीकी, रहिवाशी.
...........
ग्रामपंचायतीकडून वेळेवर कचरा उचलला जातो. मात्र पावसामुळे दिरंगाई होत आहे, याची जाणीव असून आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून कचरा वेळेत उचलावा.- सहदेव लटके, रहिवाशी

Web Title: The garbage issue front in the Manjari village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.