चाकणला पुन्हा एकदा कचराकोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:32 AM2020-12-04T04:32:39+5:302020-12-04T04:32:39+5:30

चाकण : चाकण पालिकेसह बिरदवडी,खराबवाडी या गावांचा कचरा वाघजाईनगर ( खराबवाडी) या गावांच्या हद्दीतील दगड खाणीसह परिसरातील मोकळ्या जागेत ...

Garbage once again to Chakan | चाकणला पुन्हा एकदा कचराकोंडी

चाकणला पुन्हा एकदा कचराकोंडी

googlenewsNext

चाकण : चाकण पालिकेसह बिरदवडी,खराबवाडी या गावांचा कचरा वाघजाईनगर ( खराबवाडी) या गावांच्या हद्दीतील दगड खाणीसह परिसरातील मोकळ्या जागेत टाकला जात आहे. परंतु ही मोकळी जागाच खासगी मालकीची असल्याचे सांगत संबधित जागा मालकाने कचरा डेपोकडे जाणारा रस्ताच बंद केल्याने शहराचा कचरा रस्त्यावर ओव्हर फ्लो होण्यास सुरुवात झाली आहे. पण स्थानिक ग्रामस्थांची या कचरा कोंडीतून मुक्तता होणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

खराबवाडी येथील गट नंबर ३५७ मधील सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दगड खाणीसाठी देण्यात आलेली जागा वन विभागाची आहे. या जागेत गेल्या पंधरा वर्षांपासून चाकणसह आजूबाजूच्या गावांचा कचरा टाकला जात आहे. ही जागा वनविभागाने स्वतःच्या ताब्यात घेतली आहे. वन कायद्याने राखीव वनक्षेत्रात अपप्रवेश करणे, माती, मुरूम, दगड खोदकाम करणे, कचरा टाकणाऱ्यावर फौजदारी गुन्हा व न्यायालयाचा अवमान केला म्हणुन कार्यवाही होऊ शकते .तरीही पालिकेसह काही गावांचा कचरा येथे टाकला जातो आहे. याच शेजारील जागा ही खासगी मालकीची असल्याने या कचरा डेपोकडे जाणारा रस्ता हा खासगी मालकीच्या जागेतून असल्याने संबधित जागा मालकाने अनेक दिवसांपासून चाकण नगरपरिषदेला त्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. की कचरा डेपोकडे जाणारा रस्ता खासगी जागेतून जात असल्याने तो बंद करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे जागा मालकाने रस्ता बंद केला केल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून चाकण शहरातील घंटा गाड्यांमधील कचरा खाली होऊ शकला नाही. त्यामुळे शहरातील कचरा गोळा करून कुठे साठवण करावी असा प्रश्न पालिकेपुढे उभा राहिला आहे. यामुळे नागरिकांकडून शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकला जाऊ लागला आहे. यामुळे चाकणची कचरा कोंडी निर्माण झाली आहे.

चौटक

चाकण शहराचा कचरा बिरदवडी, वाघजाईनगरच्या हद्दीत टाकण्याचे बंद झाल्यास या जाचातून स्थानिक ग्रामस्थांची कचऱ्याच्या वासातून मुक्तता होणार आहे. तर कचरा कोंडी होऊन चाकण परिसरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कचरा व्यवस्थापन कोठे करायचा यावर त्वरित तोडगा काढावा लागणार आहे. अन्यथा चाकण शहरात कचऱ्याचे ढीग लागतील. अनेक वर्षांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत होते. कचरा डेपो हटवण्यात येवा यासाठी आंदोलने,उपोषणे केली. मात्र, आश्वासनाचे फक्त गाजर मिळाले. प्रश्न जैसे थेच राहिला होता. मात्र खासगी जागा मालकाने कचरा डेपोकडे जाणारा रस्ताच बंद केल्याने सध्या तरी कचरा टाकणे बंद झाले आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पोलीस बळाचा वापर करून कचरा डेपोकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

* फोटो - कचरा डेपोकडे जाणारा रस्ता बंद केल्याने कचरा भरलेल्या घंटा गाड्या उभ्या आहेत. * फोटो - कचरा डेपोकडे जाणारा रस्ता गेट टाकून बंद करण्यात आला आहे.

Web Title: Garbage once again to Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.