औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:13 AM2021-09-12T04:13:47+5:302021-09-12T04:13:47+5:30

आंबेठाण : चाकण औद्योगिक वसाहत दोनमधील कंपन्यांना रोज निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एमआयडीसीकडे कचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने अनेक कंपन्या ...

Garbage piles along the road in the industrial colony | औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग

औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग

googlenewsNext

आंबेठाण : चाकण औद्योगिक वसाहत दोनमधील कंपन्यांना रोज निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एमआयडीसीकडे कचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने अनेक कंपन्या राजरोसपणे रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याने रस्त्यांच्या कडेला डंपिंग एरिया होऊन औद्योगिक वसाहतीचे विद्रूपीकरण होऊन कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना महामारीच्या काळात स्वच्छता आणि परिसर निर्जंतुकीकरण याला महत्त्व दिले जात आहे. या कृतीला चाकण एमआयडीसीमधील कंपन्या मात्र अपवाद ठरत आहेत. एमआयडीसी भागात रस्त्याच्या कडेला, खासगी जागेत सुरू असणारे व्यवसाय किंवा काही प्रमाणात एमआयडीसीमधील कारखानदार त्यांचा कचरा रस्त्याच्याकडेला टाकून देत आहे. त्यामुळे एमआयडीसीने तयार केलेल्या प्रशस्त रस्त्यांची कचराकुंडी होत चालली आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा उचलण्यात येत नसल्याने तेथे भटकी कुत्री, कावळ्याची संख्या वाढत आहे.

एमआयडीसीमधील बहुतांश कंपन्या आणि व्यावसायिक कोणी पाहू नये म्हणून रात्रीच्या वेळेस रस्त्याच्याकडेला कचरा टाकला जात आहे. यामुळे दिवसा रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे मोठे ढीग साचल्याचे पहायला मिळत आहेत. या कचऱ्यात कोंबड्यांची पिसे, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या,कँटीनमधील उरलेले खाद्यपदार्थ, भाजी बाजारामधील उरलेला भाजीपाला, जुने बांधकामाचा राडारोडा, सलूनमधील केस यामुळे परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. याशिवाय तेथेच कचरा कुजत असून दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या तसेच कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एमआयडीसीने कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यासाठी मागील दोन वर्षांपूर्वी सात एकर जमीन देण्याचे मान्य करून सदर प्रकल्पाचे भूमिपूजन ही करण्यात आले आहे.परंतु त्यानंतर याकडे कोणीही पाहिले नाही.

औद्योगिक वसाहतीमधील महसुली आणि एमआयडीसीमध्ये येणाऱ्या गावांचा कचरा एकत्र गोळा करून सेंद्रिय खत किंवा कचरा प्रक्रिया करणारा प्लांट सुरू करून कचरा समस्या दूर करावी.

११चाकण

औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा.

Web Title: Garbage piles along the road in the industrial colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.