उद्यान विभागाने केला गुन्हा दाखल
By admin | Published: May 26, 2017 06:24 AM2017-05-26T06:24:06+5:302017-05-26T06:24:06+5:30
मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर असलेली झाडे तोडल्याबद्दल उद्यान विभागाच्या वतीने त्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर असलेली झाडे तोडल्याबद्दल उद्यान विभागाच्या वतीने त्या बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. तत्पूर्वी वृक्षतोडीचा पोलिसांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. भूखंडाचा अनाधिकाराने ताबा घेऊन न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला म्हणून त्या व्यावसायिकांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून भूमी जिंदगी विभागाच्या वतीने वेगळी याचिकाही दाखल करण्यात येणार आहे.
विधी विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. महापालिका व मूळ जागामालक यांच्यातील प्रलंबित दाव्यात न्यायालयाने ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला होता. हा आदेश मिळाला त्या वेळी जागेभोवती कुंपण नव्हते. ते संबंधित व्यावसायिकाने नंतर घातले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाला आहे.
या जागेचा ताबा घेण्यावरून महापालिकेत जोरदार चर्चा सुरू असून, बराच ओरडा झाल्यानंतर आता भूमी जिंदगी विभागाने संबंधित व्यावसायिकांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला म्हणून अवमान याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
महापालिकेच्या विधी विभागाच्या वतीने ही माहिती
देण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला गेला
असल्याचे यात स्पष्ट दिसत
असल्याने ही याचिका
दाखल करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.