Kojagiri Purnima: कोजागिरीसाठी उघाने रात्री १२ वाजेपर्यंत उघडी राहणार
By राजू हिंगे | Published: October 27, 2023 06:55 PM2023-10-27T18:55:20+5:302023-10-27T18:55:33+5:30
पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयाअतंर्गत एकूण २११ उद्याने
पुणे: महापालिका हद्दीतील उद्यानाच्या वेळेत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त २८ ऑक्टोबर रोजी वाढ करण्यात आली आहे. शहरातील उघाने सकाळी ६ ते ११ आणि सांयकाळी ४.३० ते रात्री १२ वाजेपर्यत उघडी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या उद्यानांचा शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.
पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालया अतंर्गत एकूण २११ उद्याने आहेत. या उद्यानांचा विकास, सुशोभीकरण आणि देखभाल दुरुस्तीचे कामे उद्यान विभागामार्फत केले जाते. या उद्यानांमध्ये नागरिक, लहान मुले आणि परदेशी नागरिक मोठया प्रमाणात भेट देत असतात. त्यातच कोजागिरी पौर्णिमा २८ ऑक्टोबर रोजी आहे. त्यानिमित्ताने शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उद्यानामध्ये भेट देत असतात. त्यामुळे उद्यानांची वेळ वाढवण्यात आली आहे असे पालिकेचे उघान अधिक्षक अशाेक घोरपडे यांनी सांगितले.