गँरेज चालकाची गळा चिरून हत्या

By admin | Published: July 1, 2017 07:52 AM2017-07-01T07:52:23+5:302017-07-01T07:52:23+5:30

पर्वती पायथा येथील गॅरेज चालकाचा गॅरेजमध्येच खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून, त्याच्या गळ्यावर धारदार

Garland driver hacks his throat | गँरेज चालकाची गळा चिरून हत्या

गँरेज चालकाची गळा चिरून हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पर्वती पायथा येथील गॅरेज चालकाचा गॅरेजमध्येच खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून, त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रात्रीपासून घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी गॅरेजमध्ये जाऊन पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात आढळले.
श्रीकांत आदिनाथ हिंगे (वय ४६, रा. बालाजीनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाळू पानसांडे (वय २५, रा. बालाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगे हे पत्नी मुलासह बालाजीनगर परिसरात राहण्यास होते. त्यांचे पर्वती पायथ्याजवळ साक्षी नावाचे गॅरेज आहे. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत गॅरेजमध्ये काम करतात. सहानंतर ते गॅरेज बंद करून घरी जात. मात्र, गुरुवारी बराच उशीर झाला तरी हिंगे हे घरी आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना फोन केले. मात्र, त्यांचा फोन लागला नव्हता. कामामुळे उशीर झाला असेल म्हणून कुटुंबीय त्यांच्या घरी येण्याची वाट पाहात होते. ते रात्री उशीरापर्यंत घरी आले नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळी त्यांच्या मुलाने गॅरेजजवळ राहणारे नातेवाईक विशाल घाटगे यांना फोन केला. वडील दुकानात आहेत का, अशी विचारणा केली. त्यावेळी विशाल यांनी पाहणी केली. त्यावेळी गॅरेजचे शटर खाली ओढलेले होते. मात्र, त्याला लॉक नव्हते. त्यामुळे त्यांनी शटर उचलून पाहिले. त्यावेळी श्रीकांत हिंगे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी श्रीकांत हिंगे यांचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे समोर आले. त्यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Web Title: Garland driver hacks his throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.