सत्यनारायण पूजेवरून गोंधळ सुरूच ! गरवारे महाविद्यालयाची पूजा स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 06:04 PM2018-08-28T18:04:18+5:302018-08-28T18:04:37+5:30
महाविद्यालयात सत्यनारायण पूजा करणे योग्य की अयोग्य यावरून सुरु झालेला वाद संपण्याची चिन्हे दिसत नसून गरवारे महाविद्यालयाने ५ सप्टेंबर रोजी आयोजित पूजा स्थगित केली आहे.
पुणे : महाविद्यालयात सत्यनारायण पूजा करणे योग्य की अयोग्य यावरून सुरु झालेला वाद संपण्याची चिन्हे दिसत नसून गरवारे महाविद्यालयाने ५ सप्टेंबर रोजी आयोजित पूजा स्थगित केली आहे.
राज्यशासनाने सरकारी कार्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक विधी करण्यास पूर्णत: मनाई केली आहे. जून २०१७ मध्ये काढलेल्या एका परिपत्रकामध्ये सर्व शासकीय संस्थांमधील देव-देवतांचे फोटो सन्मानाने बाहेर काढण्यात यावेत असे निर्देश दिले आहेत. शुक्रवार (दि.२४) रोजी शहरातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यशासनाने सरकारी कार्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक विधी करण्यास पूर्णत: मनाई केली आहे. जून २०१७ मध्ये काढलेल्या एका परिपत्रकामध्ये सर्व शासकीय संस्थांमधील देव-देवतांचे फोटो सन्मानाने बाहेर काढण्यात यावेत असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या पूजेला विद्यार्थी संघटनेने विरोध करत आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला उत्तर म्हणून आज (दि.२८) रोजी फर्ग्युसन प्रशासनाला पाठिंबा देण्यासाठी पतित पावन संघटनेने महाविद्यालयाच्या दारावर पूजा घातली. मात्र हा वाद इथेच संपला नाही. येत्या बुधवारी आयोजित करण्यात आलेली आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील पूजाही विद्यार्थी संघटनेच्या विरोधामुळे स्थगित करण्यात आली आहे.
याबाबत प्राचार्य मुक्तजा मठकरी यांना निवेदन देण्यात येणार होते. मात्र गरवारे महाविद्यालयाने ही पूजा महाविद्यालय प्रशासन नव्हे तर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे आयोजित केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.परंतु शासकीय परिपत्रक असताना महाविद्यालयात पूजा घालण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला. अखेर हे सर्व लक्षात घेऊन महाविद्यालय प्रशासनातर्फे जाहीर सूचना काढून सत्यनारायण स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याबाबत संस्थेच्या नियामक मंडळाशी बोलणे सुरु असल्याचेही यात सांगण्यात आले आहे.