गॅसच्या स्फोटाने 9 सदनिकांचे नुकसान
By admin | Published: September 20, 2014 12:17 AM2014-09-20T00:17:58+5:302014-09-20T00:17:58+5:30
वाल्हेकरवाडीच्या (चिंचवड) रेल्वे कॉलनीतील एका इमारतीत शुक्रवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये इमारतीतील सहा जण जखमी झाले.
Next
पिंपरी : वाल्हेकरवाडीच्या (चिंचवड) रेल्वे कॉलनीतील एका इमारतीत शुक्रवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये इमारतीतील सहा जण जखमी झाले. जखमींमध्ये एका वृद्धाचा समावेश आहे.
मोरेश्वर सुदाम मानमोडे (वय 76), प्रमोद शहाजी भोसले (वय 26), बसवराज हनुमंत मरबे (35), शरद नागराज पवार (वय 26), भारत विष्णू तोडकर (वय 24), प्रकाश नायक (वय 23) अशी जखमींची नावे आहेत. वाल्हेकरवाडीतील सव्र्हे क्रमांक 129 येथे तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एकूण 15 खोल्या आहेत. खासगी कंपनीत काम करणारे, तसेच छोटे व्यावसायिक या ठिकाणी राहतात. पहिल्या मजल्यावरील बी 7 या सदनिकेत राहणा:या मोरेश्वर मानमोडे यांच्या खोलीत सकाळी 6.5क् ला त्यांच्या खोलीत स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे मानमोडे यांच्या खोलीची सिमेंटची भिंत कोसळली. तसेच शेजारील तब्बल 9 खोल्यांचे दरवाजे अक्षरश: तुटून पाच ते दहा फूट लांब फेकले गेले. काही दरवाजांचे तुकडे झाले. खोल्यांच्या भिंतीलाही तडे गेले असून, खिडक्या तुटून पडल्या आहेत. स्फोटामुळे विद्युतपुरवठाही खंडित झाला. स्फोटात मानमोडे गंभीर जखमी आहेत. (प्रतिनिधी)
पलंगावर झोपलो होतो. सकाळी अचानक मोठा आवाज झाला अन् डोक्यात फरशीचा तुकडा लागला. रक्तबंबाळ अवस्थेत पत्नीसह सैरावरा पळू लागलो. नक्की काय झाले आहे काहीही समजत नव्हते. त्या आवाजाची अजूनही मनात भीती आहे.
- प्रकाश नायक, रहिवासी