जुन्नरमध्ये गॅस शवदाहिनीच्या कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:06 AM2021-05-03T04:06:11+5:302021-05-03T04:06:11+5:30

जिल्हा नियोजन मंडळाकडून शवदाहिनीच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात जुन्नर नगरपालिका ही ...

Gas cremation work begins in Junnar | जुन्नरमध्ये गॅस शवदाहिनीच्या कामास सुरुवात

जुन्नरमध्ये गॅस शवदाहिनीच्या कामास सुरुवात

Next

जिल्हा नियोजन मंडळाकडून शवदाहिनीच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात जुन्नर नगरपालिका ही गॅस शवदाहिनी बसविणारी पहिलीच नगरपालिका असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले. पर्यावरणपूरक व कमी वेळात अंत्यसंस्कार हा गॅस शवदाहिनीचा फायदा आहे. जुन्नर शहरामध्ये सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता व भविष्याचा विचार करता सदरहू गॅस शवदाहिनी उपयुक्त ठरणार आहे. गॅस शवदाहिनीकरिता ४८ सिलिंडर लागणार आहेत. एका सिलिंडरमध्ये २ मृतदेहांवर सुमारे ६५० अंश सेल्सिअस तापमानात साधारणतः १५ मिनिटांमध्ये अंत्यसंस्कार पूर्ण होतील. सर्व सोयींयुक्त गॅस शवदाहिनी ही शहरवासीयांसाठी भविष्याचा वेध घेता गरजेची आहे. मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व शहर अभियंता विवेक देशमुख व सर्व पदाधिकारी यांनी शवदाहिनीच्या कामासाठी पाठपुरावा केला.

०२ जुन्नर

जुन्नर नगरपालिकेच्या वतीने शवदाहिनीच्या कामास सुरुवात करताना नगराध्यक्ष शाम पांडे व अधिकारीवर्ग.

Web Title: Gas cremation work begins in Junnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.