Gas cylinder explosion : गोकुळनगर, वारजे माळवाडीत सिलेंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 10:37 IST2025-04-09T10:35:57+5:302025-04-09T10:37:39+5:30
या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून

Gas cylinder explosion : गोकुळनगर, वारजे माळवाडीत सिलेंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू
पुणे - वारजे माळवाडीतील गोकुळनगर परिसरातील सर्वे नं. ५२ मधील एका पत्र्याच्या घरात मंगळवारी (९ एप्रिल) पहाटेच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे १ वाजून ५६ मिनिटांनी आगीची माहिती मिळताच वारजे, सिंहगड रोड आणि कोथरूड अग्निशमन केंद्राच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी होज लाईनच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले.
आगीत गंभीर जखमी झालेले मोहन माणिक चव्हाण (वय ४३) आणि अतिश मोहन चव्हाण (वय २५) या दोघांना तातडीने ॲम्बुलन्सद्वारे ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी अधिकारी उमराटकर, तांडेल मरळ, फायरमन भिलारे, माने, साळुंखे, मदतनीस ओवाळ व वाहनचालक डावरे यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान मदतकार्य करत होते. अधिक तपास सुरू आहे.