पुणे सातारा महामार्गालगतच्या वरवे खुर्द येथे गॅसचा स्फोट; चार जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 09:11 PM2022-11-25T21:11:52+5:302022-11-25T21:12:45+5:30
लायटर लवकर न सापडलेने गॅस घरात जास्त पसरल्याने स्फोट झाला
नसरापूर : पुणे सातारा महामार्गालगतच्या वरवे खुर्द येथील एका घरात स्वयंपाकाचा गॅस चालु करीत असताना त्यांना लायटर लवकर न सापडलेने गॅस घरात जास्त पसरल्याने स्फोट झाला. या दुर्घटनेंत घरातील चार जण भाजून जखमी झाले आहेत. सदरची जळीत घटना आज सकाळी सव्वा पाच वाजता घडली आहे.
या दुर्घटनेत जलिदंर नारायण जाधव, कु. रिध्दी संदीप शितोळे (वय - ६ ),यश मोहन ताकवले (वय- ११) ,संदीप बाळासो कदम (वय - ३४) सर्व रा. वरवे खुर्द ता. भोर जि. पुणे हे भाजलेने त्यात जखमी झाले आहे. तर रिध्दी हीस पुणे येथे उपचारासाठी नेले आहे. याप्रकरणी शिंदेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरवे खुर्द येथील जलिदंर नारायण जाधव रा. वरवे यांचे घरात त्यांना चहा करणेसाठी घरातील गॅस चालु करीत असताना त्यांना लायटर लवकर न सापडलेने गॅस घरात जास्त पसरलेने स्फोट झाला. त्यावेळी संदीप बाळासाहबे थोपटे यांना मदतीसाठी जलिदंर नारायण जाधव यांनी बोलाविले होते. त्यावेळी प्रसंगावधान राखून थोपटे यांनी सदर घटने ठिकाणी गेले. तसेच घराजवळ लोकेश मोरे हे ही त्यांची कार घेउन मदतीसाठी धावले. त्यांच्या मदतीने जखमींना शिवापूर येथील श्लोक हॉस्पीटल येथे हलविले आहे. तर रिध्दी संदीप शितोळे हीस पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटल या ठिकाणी नेले आहे.