गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला! फ्लॅॅटमध्ये पेटवायच्या का चुली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:10 AM2021-09-03T04:10:12+5:302021-09-03T04:10:12+5:30

(स्टार ११३२ डमी) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याला वाढत आहेत. एक सप्टेंबरला यात पुन्हा ...

Gas goes up by Rs 25 again Why light a stove in a flat? | गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला! फ्लॅॅटमध्ये पेटवायच्या का चुली?

गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला! फ्लॅॅटमध्ये पेटवायच्या का चुली?

googlenewsNext

(स्टार ११३२ डमी)

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याला वाढत आहेत. एक सप्टेंबरला यात पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे शहरातील फ्लॅटमध्येसुद्धा आता चुली पेटविण्याची वेळ आली आहे का, अशी विचारणा आता गृहिणी करू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्या महिन्यात गॅसची दरवाढ झाली आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यांत ७५ रुपये वाढल्याने सर्वसामान्य कुटुंब मेटाकुटीला आले आहेत.

श्रावण महिन्यापासून विविध सणवारांना आपल्याकडे सुरुवात होते. मात्र, नेमकी याचकाळात दर वर्षी दैनंदिन लागणारा किराणा असो की गॅस. मागील काही वर्षांत दरवाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा तर दरवाढीचा कहर झाला आहे. गेल्या तीन महिन्यांत गॅसचे दर ७५ रुपयांनी (वर्षभरात २६०-२६५ रुपये) वाढले आहेत. गॅस ही प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन गरज झाली आहे. सातत्याने दर वाढत असल्याने या महागाईचा सर्वात जास्त फटका गृहिणींना बसत आहे.

----

* ...असे वाढले गॅसचे दर (ग्राफ)

दिनांक दरवाढ सिलिंडरचे दर

१ डिसेंबर २०२० ५० ६४७

१ जानेवारी २०२१ ५० ६९७

१ फेब्रुवारी २०२१ १०० ७९७

१ मार्च २०२१ २५ ८२२

१ एप्रिल १० ८१२

१ मे २०२१ ० ८१२

१ जून २०२१ ० ८१२

१ जुलै २०२१ २५.५ ८३७.५०

१ ऑगस्ट २०२१ २५ ८६२.५०

१ सप्टेंबर २०२१ २५.५ ८८७.५

-----

* सबसिडी किती भेटते हो भाऊ?

पूर्वी गॅसवर केंद्र शासनाकडून सबसिडी मिळत होती. साधरण १००, १२५ ते १५० रुपयांपर्यंत ही सबसिडी प्रत्येक गॅसच्या टाकीमागे मिळायची. मागील दोन वर्षांपासून मात्र ती पूर्णपणे केंद्र सरकारने बंद केली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅसवर कोणत्याही प्रकारची सबसिडी मिळत नाही.

---

* व्यावसायिक सिलिंडरही महाग

व्यावसायिक गॅसचे दरही सातत्याने वाढत आहे. जूनमध्ये १४७३.५०, तर जुलै महिन्यात १५५० रुपये दर होता. म्हणजे या एका महिन्यात ७६ रुपयांनी दरवाढ झाली आहे. सध्या १६२५ दर झाला आहे. म्हणजे मागील दोन महिन्यांत व्यावसायिक गॅस तब्बल १५० रुपयांनी महागल्याचे पाहायला मिळत आहे.

---

* महिन्याचे गणित कोलमडले

१) कोरोनामुळे माझ्या पतीचा रोजगार गेला आहे. सध्या मिळेत ते काम करत आहेत. त्यातच गॅसचे दर दरमहिन्याला वाढत आहे. केंंद्र सरकारने सबसिडी बंद केली आहे. त्यामुळे घरसंसार चालवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे.

- सोनल हारगुडे, गृहिणी

--

२) गेल्या तीन महिन्यांत सातत्याने गॅसचे दर वाढत आहेत. त्यामुळे महिन्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्याबाबत राज्य असो की केंद्र सरकार गप्प आहे. महागाई कमी करण्यासाठी त्यांनी पावले उचलत सर्वसामान्यांना दिलासा द्यायला हवा.

- शकुंतला कदम, गृहिणी

Web Title: Gas goes up by Rs 25 again Why light a stove in a flat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.