खालुंब्रेत गॅसगळती

By admin | Published: February 12, 2015 02:26 AM2015-02-12T02:26:19+5:302015-02-12T02:26:19+5:30

चाकण- तळेगाव रस्त्यावर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास टँँंकरमधून गॅस गळती झाली. गाडी उभी करून वाहन चालकाने पळ

Gasoline in the bottom | खालुंब्रेत गॅसगळती

खालुंब्रेत गॅसगळती

Next

चाकण : चाकण- तळेगाव रस्त्यावर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास टँँंकरमधून गॅस गळती झाली. गाडी उभी करून वाहन चालकाने पळ काढल्याने चाकण-तळेगाव रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली दोन्ही बाजूला ५-६ किलो मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
गॅस भरलेला टंकर मुंबई बाजूकडून चाकणकडे जात होता. घटनास्थळी चाकण पोलीस ठाण्यातील सहा व पंतप्रधान बंदोबस्तातील १५ असे एकूण २१ पोलीस रवाना झाले असून फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या रवाना झाल्या होत्या.
भारत गॅसच्या शिक्रापूर येथील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून रात्री ९ वाजेपर्यंत अधिकारी पोहोचले नव्हते. कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून गावातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ५ ते ६ किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर वाहनांच्या तीन पदरी रांगा लागल्या आहेत.
पोलिसांनी देहूफाटा मार्गे व चाकण एमआयडीसी तून तळवडे मार्गे वाहतूक वळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Gasoline in the bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.