कळसला पाटील कुटुंबात २७ वर्षांपासून गौराईची आरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:14 AM2021-09-14T04:14:33+5:302021-09-14T04:14:33+5:30

कळस येथे गणेशोत्सवात गौराईंचा सण उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. येथील जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली ...

Gaurai has been in the Kalasala Patil family for 27 years | कळसला पाटील कुटुंबात २७ वर्षांपासून गौराईची आरास

कळसला पाटील कुटुंबात २७ वर्षांपासून गौराईची आरास

Next

कळस येथे गणेशोत्सवात गौराईंचा सण उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. येथील जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली पाटील यांच्या कुटुंबात गेल्या २७ वर्षांपासून गौरींची स्थापना होत आहे. यंदा फुलांची आरास साकारण्यात आली आहे त्यांनी केलेली गौरीची आरास विशेष आकर्षण ठरली आहे. त्यांच्या सून कळस गावच्या सरपंच वृषाली पाटील, पायल पाटील यांच्याकडून आरास साकारण्यात आली आहे. यंदा त्यांनी फुलांची आरास साकारून या सजावटीत गौरीसमोर गौरीच्या स्वागतासाठी विविध प्रकारचे पदार्थ लाडू, करंजी, चिवडा, अनारसे, चकली आदी ठेवले होते तसेच विविध प्रकारच्या मिठाईंचा समावेश होता. यात पहिल्या दिवशी गौराईंची स्थापना, दुसऱ्या दिवशी महानैवेद्य व हळदी- कुंकवाचा कार्यक्रम होता यानिमित्त हा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे.

१३ कळस

130921\inshot_20210913_182045480.jpg

??? ?? ??????? ????? ?????? ?????????? ?????? ?????? ????? ??????? ??? ??????? ????

Web Title: Gaurai has been in the Kalasala Patil family for 27 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.