Video: गौरव अहुजा १० ते १२ तासांनी पोलिसांना शरण गेलाय; अल्कोहोलचे हवे असलेले प्रमाण मिळेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:36 IST2025-03-10T16:35:42+5:302025-03-10T16:36:18+5:30

पोर्शे अपघातातील बिल्डर बाळाला वाचवण्यासाठी जे प्रयत्न केले गेले, तेच गौरवसाठी होत आहेत का? पुणेकरांचा सवाल

Gaurav Ahuja surrendered to the police after 10 to 12 hours; Will he get the required quantity of alcohol? | Video: गौरव अहुजा १० ते १२ तासांनी पोलिसांना शरण गेलाय; अल्कोहोलचे हवे असलेले प्रमाण मिळेल का?

Video: गौरव अहुजा १० ते १२ तासांनी पोलिसांना शरण गेलाय; अल्कोहोलचे हवे असलेले प्रमाण मिळेल का?

पुणे: येरवडा चौकात मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करून अश्लील वर्तन करणारा गौरव अहुजा हा जवळपास दहा ते बारा तासांनी पोलिसांना शरण गेला. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. रात्रीपर्यंत त्याने प्रसार माध्यमांना मुलाखत एक व्हिडिओ जारी करुन माफी मागितली. यात तो शिंदे साहेबांचीही माफी मागतोय. हे शिंदे साहेब कोण? असा सवाल उपस्थित होत असतानाच अहुजा हा एवढ्या उशिराने आणि साताऱ्याला का पोलिसांना शरण गेला? अल्कोहोलचे हवे असलेले प्रमाण मिळेल का? असा सवाल पुणेकरांकडून विचारला जातोय.  

काही महिन्यांपूर्वी बिल्डर बाळाने जेव्हा मध्यरात्री रस्त्यावर उत्पाद माजवला होता. तेव्हा मद्यधुंद असल्यापासून वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात मागच्या बाजूला बर्गर खायला दिला होता. त्याच्या शरीरातील दारू शोषली जाऊन तो दारूच्या नशेत असल्याचा रिपोर्ट येऊ नये म्हणून हे सर्व केलं गेलं. तसेच त्यानंतर त्याचे नमुनेही बदलले गेले होते. त्यात त्या बिल्डर बाळाच्या आईला अटक करण्यात आली होती. अशातच आता या आहुजालाही वाचविण्यासाठी आठ तासांपेक्षा जास्त वेळेची शक्कल लढविण्यात आल्याचं बोललं जातंय.

गौरव अहुजा पोलिसांना तोपर्यंत शरण जाणार नाही जोपर्यंत त्याच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण पूर्णतः नाहीसे होत नाही. असे आपचे नेते या प्रकरणात उघडपणे बोलणारे विजय कुमार यांनी म्हटलं होतं. कारमध्ये त्याच्यासोबत त्याचा मित्र भागेश ओसवाल देखील होता. त्याच्या हातात दारूची बाटली दिसत आहे. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. आणि अहुजा हा गाडीही चालवत होता तरीही या दोघांचा मेडिकल रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. यात जर अहुजा मद्यधुंद अवस्थेत होता हे सिद्ध झालं नाही तर त्याला फायदा मिळू शकतो. यामुळे त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न झाले असावेत अशी शंका आता पुणेकरांना येत आहे.

गौरव अहुजावर गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. मोबाइल बंद होता. मग त्याची मुलाखत घेणाऱ्यांशी कसा संपर्क झाला? अहुजाने पुण्यात सरेंडर व्हायचे सोडून आठ दहा तासांनी साताऱ्यात का सरेंडर केले? असे सवाल उपस्थित होत आहेत. गौरवच्या मेडिकलमध्ये आता अल्कोहोलचे हवे असलेले प्रमाण मिळेल का? असा सवालही पुणेकर विचारत आहेत. एकंदरीतच याला वाचवण्यासाठी ही सर्व खेळी रचली गेल्याचे पुणेकरांनी व्यक्त केलंय.

Web Title: Gaurav Ahuja surrendered to the police after 10 to 12 hours; Will he get the required quantity of alcohol?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.