भरचौकात लघुशंका करणाऱ्या आहुजाला पुन्हा १ दिवसाची पोलीस कोठडी, तर भाग्येशला न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:13 IST2025-03-10T18:13:34+5:302025-03-10T18:13:59+5:30
आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली होती

भरचौकात लघुशंका करणाऱ्या आहुजाला पुन्हा १ दिवसाची पोलीस कोठडी, तर भाग्येशला न्यायालयीन कोठडी
पुणे : लक्झरी कारने जात असताना, एका तरुणाने येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून लघुशंका केल्याचा व्हिडीओ शनिवारी (दि. ८) व्हायरल झाला. त्यानंतर शहरात संतप्त पडसाद उमटले. याची गंभीर दखल घेत येरवडा पोलिसांनी गौरव आहुजा याला रविवारी (दि. ९) सकाळी अटक केली. याप्रकरणी गौरव मनोज आहुजा (२५, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) व त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (२५, रा. मार्केट यार्ड) यांच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ओसवाल याला शनिवारी रात्री अटक केली. दरम्यान गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.
आज कोठडी संपल्यावर गौरव आहुजा याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याला हजर करण्यात आल होत. गौरव आहुजा ने जे अश्लील कृत्य पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर येथे केलं होतं. त्या ठिकाणी आज येरवडा पोलिसांनी आहुजाला घेऊन जात पंचनामा केला. आहुजा याचा सोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याला सुद्धा पोलिसांनी घटनास्थळी नेऊन संपूर्ण घटनेचा पंचनामा केला.
कोर्टात असा झाला युक्तिवाद
घटनेच्या वेळी जी BMW होती ती जप्त केली आहे. आरोपीचा मोबाईल अजून जप्त करायचा आहे. त्यामुळे आरोपींना २ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी. गाडी जप्त आहे. मात्र त्याला असलेल्या दोन्ही नंबर प्लेट काढून ठेवल्या आहेत. असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
पोलिस कोठडी मागणे जस्टीफाय होत नाही. अंगावर असलेले कपडे सुद्धा आम्ही पोलिसांना दिले आहे. मोबाईल जो होता तो पण दिला आहे. भाग्येश ओसवालच्या वकिलांनी सांगितले.
ज्या कारणासाठी पोलिसांनी काल कोठडी मागितली ती कोर्टाने दिली. मात्र त्यानंतर पोलिसांकडे कुठलेच कारण नाही तरी ते पोलिस कोठडी मागत आहेत. विनाकारण ग्राउंड वर पोलिस कोठडी मागण्यात आली आहे असा युक्तिवाद आहुजाच्या वकिलांनी पुणे सत्र न्यायालयात केला. तसेच ओसवाल यांच्या वकिलांनी केला न्यायालयात जामीनासाठी आज अर्ज केला.
आहुजाला पोलीस तर भाग्येशला न्यायालयीन कोठडी
वकिलांच्या युक्तिवादानंतर पुणे सत्र न्यायालयाने गौरव आहुजा याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.