सोन्या-मोत्याच्या पावलांनी गौरी आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:10 AM2021-09-13T04:10:02+5:302021-09-13T04:10:02+5:30

गौरींसमोर विविध प्रकारची फळे, विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ, विविध प्रकारच्या भाज्या, तसेच समोर रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच गौरीला विविध ...

Gauri came with gold-pearl footsteps | सोन्या-मोत्याच्या पावलांनी गौरी आली

सोन्या-मोत्याच्या पावलांनी गौरी आली

googlenewsNext

गौरींसमोर विविध प्रकारची फळे, विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ, विविध प्रकारच्या भाज्या, तसेच समोर रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच गौरीला विविध प्रकारचे अलंकार घालून सजविले होते. लक्ष्मीची पावले देवघरा पासून सर्व ठिकाणी काढून त्यांची पूजा केली जाते. तसेच गौरींसमोर विविध प्रकारची चित्रेही मांडली होती. गौरीसमोर बाळही ठेवले होते. तर काही ठिकाणी वाजतगाजत कोण येते ज्येष्ठाला भेटायला कनिष्ठा येते असा काही ठिकाणी गजर करीत गौरींची आगमन होते. उद्या गौरींचे पाची पक्वान्नांचे जेवण आहे. यासाठी सोळा प्रकारच्या भाज्या, १६ चटण्या, १६ कोशिंबीरी, पंचपक्वान्नांचे जेवण, लाडू, अनारसे आदी करतात. ग्रामीण भागात गौरी पहाण्यासाठी मोठी गर्दी महिलांकडून केली जाते. काही ठिकाणी १६ दिव्यांनी आरती करतात. रिती रिवाजाप्रमाणे देवीची पूजा करतात. काही ठिकाणी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.तर(दि.१४)रोजी गौरी उठतात.

120921\img-20210912-wa0111.jpg

बेल्हा(ता.जुन्नर)येथे गौरींचे उत्साहात आगमन झाले.

Web Title: Gauri came with gold-pearl footsteps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.