गौरी-गणपती सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 AM2021-09-21T04:11:55+5:302021-09-21T04:11:55+5:30
जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचतगट असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन बारामती : इंदापूर येथील जिजाऊ महिला बचतगट असोसिएशनच्या वतीने ...
जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचतगट असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
बारामती : इंदापूर येथील जिजाऊ महिला बचतगट असोसिएशनच्या वतीने गौैरी-गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ८५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.
महिलांमध्ये असलेल्या कलागुणांना व त्यांच्यामधील कल्पकतेला वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील आणि जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी दिली.
विजेत्यांची नावे अशी : प्रीती सोमनाथ पिसाळ देशमुख (तक्रारवाडी), कांताबाई पांडुरंग हुंबे (कचरवाडी बा.), रूपाली संतोष दातखिळे (सरडेवाडी), स्वाती दत्तात्रय दातखिळे (सरडेवाडी), सोनाली बाळासाहेब राऊत (निमगाव केतकी), प्रियंका सागर ठोंबरे (लासुर्णे), छाया मधुकर कुंभार (अंथुर्णे), मेघा लखोजी जगताप (कालठण नंबर- २), सोनाली सचिन शेंडे (इंदापूर) या विजेत्या स्पर्धकांचा गौैरव करण्यात आला.
तसेच निमगाव केतकी येथील तेजस गायकवाड यांचा विशेष सन्मान अंकिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गौरी संजय फडतरे हीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवल्याबद्दल जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचतगट असोसिएशनच्या वतीने तिला पाच हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा माया विंचू ,युथ कनेक्टच्या सहकारी भाग्यश्री धायगुडे, पूजा शिंदे यावेळी उपस्थित होत्या.
-------------------------
फोटो ओळी : इंदापूर येथे जिजाऊ असोसिएशनच्या वतीने घेतलेल्या गौरी-गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
२००९२०२१-बारामती-०३
--------------------------------