गौरी काटे यांचा ‘मॅक्स वुमन’ पुरस्काराने सन्मान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:32 AM2017-10-17T02:32:15+5:302017-10-17T02:32:26+5:30

ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी काटे यांना ‘मॅक्स वुमन’ पुरस्काराने गौरविण्यात आले. समाज बदलासाठी मॅक्झिमम योगदान देणा-या विविध क्षेत्रांतल्या महिलांना राज्य महिला आयोग व मॅक्स महाराष्ट्र यांच्या वतीने पुरस्कार जाहीर झाले होते.

 Gauri Kate honored with 'Max Woman' award | गौरी काटे यांचा ‘मॅक्स वुमन’ पुरस्काराने सन्मान  

गौरी काटे यांचा ‘मॅक्स वुमन’ पुरस्काराने सन्मान  

googlenewsNext

काटेवाडी : ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी काटे यांना ‘मॅक्स वुमन’ पुरस्काराने गौरविण्यात आले. समाज बदलासाठी मॅक्झिमम योगदान देणा-या विविध क्षेत्रांतल्या महिलांना राज्य महिला आयोग व मॅक्स महाराष्ट्र यांच्या वतीने पुरस्कार जाहीर झाले होते.
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, वीरमाता आणि लेखिका अनुराधा गोरे आणि मॅक्स महाराष्ट्रचे संस्थापक रवींद्र आंबेकर यांच्या हस्ते सरपंच काटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयोगाच्या सदस्या आशाताई लांडगे, गयाताई कराड आणि सदस्य सचिव डॉ. मंजूषा मोळवणे या वेळी उपस्थित होत्या.
या वेळी सरपंच काटे म्हणाल्या की, स्वच्छता अभियानच्या प्रणेत्या सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून गावचा ग्रामविकास साधला आहे. हा गौरव पवार यांच्यासह ग्रामस्थांच्या सहभागाने प्राप्त झाला आहे. काटेवाडीला चकाचक करणाºया काटेंसह स्वत: दोन्ही पायांनी अपंग असूनही शेकडो महिलांना पायावर उभ्या करणाºया परभणीच्या आशालता गिरी, दारुबंदीसाठी प्रसंगी जीव धोक्यात घालणाºया बीडच्या सत्यभामा सौंदरमल, बाहेरच्या सौंदर्यापेक्षा स्त्रियांचे आंतरिक वैचारिक सौंदर्य वाढवण्यासाठी ब्युटी पार्लरच्या व्यवसायातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत आलेल्या नंदिनी जाधव, नागपुरातील पहिली महिलांसाठीची बँक स्थापन करणाºया नीलिमा बावणे, बांधकाम व्यवसायाची धुरा पेलताना पोटतिडकीने सामाजिक बांधिलकी जपणाºया उज्ज्वला हावरे, स्वत: दृष्टिहीन असताना इतरांची आयुष्ये प्रकाशमान करणाºया धुळ्याच्या अरुणा बोळके, वैधव्यावर मात करत इतर विधवा-परित्यक्तांसाठी झटणाºया लातूरच्या भाग्यश्री रणदिवे आणि आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या ठाण्याच्या डॉ. मेधा मेहंदळे या महिलांना मॅक्स वूमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महिला आयोगासाठी हा महत्त्वाचा क्षण असून विविध क्षेत्रांत काम करणाºया महिलांचा गौरव तर होतच आहे. सोबत आयोग या महिलांच्या कामाशी यानिमित्तानं घट्टपणे जोडला जात आहे, असे विजया रहाटकर यांनी या वेळी सांगितले. बँकिंगच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण, दारूबंदी, एकल महिलांना मदत, आयुर्वेदाचाप्रसार अशा प्रत्येक कामात आयोग भरीव योगदान देण्यास तयार आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. या सर्व महिलांचे काम अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना अनुराधा गोरे यांनी व्यक्त केली.

Web Title:  Gauri Kate honored with 'Max Woman' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे