रेटवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गौरी पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:11 AM2021-02-27T04:11:02+5:302021-02-27T04:11:02+5:30
सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक बुधवार दि.२४ रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झाली. निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी गौरी नवनाथ पवार यांनी तर उपसरपंचपदासाठी नीलम ...
सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक बुधवार दि.२४ रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झाली. निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी गौरी नवनाथ पवार यांनी तर उपसरपंचपदासाठी नीलम सुभाष हिंगे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र अर्ज भरण्याच्या मुदतीत दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संतोष रोडे यांनी सरपंचपदी गौरी पवार व उपसरपंचपदी नीलम हिंगे या उमेदवारांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप डुबे, किरण पवार, शांताराम शिंदे, सुनंदा पवार, माया थिटे उपस्थित होते.
तसेच ग्रामविकास अधिकारी आर. टी. सात्रस, तलाठी आरदवड, पोलीस सुदाम घोडे, पोलीस पाटील उत्तमराव खंडागळे, तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश वाबळे, माजी उपसरपंच नवनाथ पवार, सुभाष हिंगे, अतुल थिटे, राजू जाधव, अनिल पवार, शंकर काळे, शरद वाबळे, संजय हिंगे, विलास थिटे, रामदास रेटवडे, माणिक रेटवडे, चेअरमन संतोष डुबे, निवृत्ती पवळे, विलास पवार, संजय पवार, कैलास हिंगे, सतीश वाबळे, युवराज गोपाळे, विलास पवळे, रामदास देशमुख, चेअरमन सुरेश रेटवडे, योगेश रेटवडे व इतर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच व उपसरपंच यांच्या निवडीनंतर सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा रोकडोबा महाराजांच्या मंदिरात सत्कार करण्यात आला.
रेटवडी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य.