गवार, शेवगा, वाटाणा कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 02:41 AM2018-10-29T02:41:18+5:302018-10-29T02:41:36+5:30

गवार ५०००, शेवगा ६०००, तर वाटाणा १०,००० रुपये क्विंटल; कांदा गडगडला

Gavar, Shevga, Pea Peel | गवार, शेवगा, वाटाणा कडाडला

गवार, शेवगा, वाटाणा कडाडला

googlenewsNext

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये गवार, शेवगा व वाटाण्याचे भाव कडाडले. गवारीला ५०००, शेवग्याला ६०००, तर वाटाण्याला १०,००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. टोमॅटोची ९४० क्रेट्स, तर हिरव्या मिरचीची ४१० पोती आवक झाली. हिरव्या मिरचीचे भाव घसरले.

मेथी, कोथिंबिरीची आवक वाढली. मेथी, शेपू, कोथिंबिरीच्या भावात वाढ झाली. कांदा-बटाट्याच्या बाजारात कांद्याची आवक ५२३ क्विंटलने वाढून भाव ४०० रुपयांनी गडगडले. कांद्याला १६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात शेळ्या-मेंढ्या, म्हशी व बैलांची विक्री वाढली. बाजार समितीमध्ये एकूण दोन कोटी पंचाऐंशी लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले यांनी दिली.

येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ११२८ क्विंटल होऊन कमाल भाव १६०० रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ५६५ क्विंटल होऊन बटाट्याचा कमाल भाव २२०० रुपये झाला. बटाट्याची आवक १३३० क्विंटलने घटली. भुईमूग शेंगाची १० क्विंटल आवक झाली असून भुईमूग शेंगांना ४५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लसणाची एकूण ४ क्विंटल आवक झाली. लसणाची आवक तीन क्विंटलने घटली. लसणाचा कमाल भाव १८०० रुपयांवर स्थिर राहिला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण ४१० पोती आवक झाली. मिरचीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव :
कांदा - एकूण आवक - ११२८ क्विंटल. भाव क्रमांक १ : १६०० रुपये, भाव क्रमांक २ : १३५० रुपये, भाव क्रमांक ३ : ८०० रुपये. बटाटा - एकूण आवक - ५६५ क्विंटल. भाव क्रमांक १ : २२०० रुपये, भाव क्रमांक २ : १८०० रुपये, भाव क्रमांक ३ : १२०० रुपये. भुईमूग शेंग - एकूण आवक - १० पोती, भाव क्रमांक १: ४५०० रुपये, भाव क्रमांक २ : ४००० रुपये, भाव क्रमांक ३ : ३५०० रुपये. लसूण - एकूण आवक - ४ क्विंटल. भाव क्रमांक १ : १८०० रुपये, भाव क्रमांक २ : १५०० रुपये, भाव क्रमांक ३ : १००० रुपये.

पालेभाज्या :
पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव : -मेथी - एकूण १६४२५ जुड्या (७०० ते १४०० रुपये), कोथिंबीर - एकूण १५४२० जुड्या (७०० ते १२०० रुपये), शेपू - एकूण ४२८० जुड्या (५०० ते १००० रुपये), पालक - एकूण ३२२५ जुड्या

फळभाज्या :
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रति १०० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव रुपयांत असे :
टोमॅटो - ९४० पेट्या (७०० ते १२००), कोबी - ३२४ पोती (२०० ते ६००), फ्लॉवर - ३१० पोती (७०० ते १२००), वांगी - २९५ - पोती (३००० ते ४०००), भेंडी - ३२५ डाग (३००० ते ४०००), दोडका - २७० पोती (१५०० ते ३००० ), कारली - ३१५ डाग (१५०० ते ३०००), दुधीभोपळा - २२५ पोती (८०० ते १६००), काकडी - २८५ पोती (८०० ते १५००), फरशी - ११० पोती (३००० ते ४०००), वालवड - २०५ पोती (३००० ते ४०००), गवार - ८० पोती (४००० ते ५०००), ढोबळी मिरची - ४९७ डाग (१००० ते २०००), चवळी - १४० पोती (१००० ते २०००), वाटाणा - ३५ पोती (८००० ते १०,०००), शेवगा - ७० डाग (४००० ते ६००० रुपये).
 

Web Title: Gavar, Shevga, Pea Peel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.