TET Exam Scam:...त्याने पेनड्राईव्हमध्ये दिली परीक्षार्थींची यादी; एजंटांना दिले तब्बल 80 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 08:33 PM2022-02-18T20:33:22+5:302022-02-18T20:40:42+5:30

परीक्षार्थींकडून घेतलेले 80 लाख रूपयांची रोख रक्कम एजंट संतोष लक्ष्मण हरकळ आणि अंकुश रामभाऊ हरकळ यांना आणून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांंनी न्यायालयात सांगितले

gave a list of candidates in a pen drive 80 lakh paid to agents in tet exam scam | TET Exam Scam:...त्याने पेनड्राईव्हमध्ये दिली परीक्षार्थींची यादी; एजंटांना दिले तब्बल 80 लाख

TET Exam Scam:...त्याने पेनड्राईव्हमध्ये दिली परीक्षार्थींची यादी; एजंटांना दिले तब्बल 80 लाख

Next

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०१८ च्या परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी ( वय 33 रा; मूळगाव अगोदे, ता.नांदगाव जि.नाशिक) या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीने ऑक्टोबर २०१८ मध्ये परीक्षार्थींची यादी पेनड्राईव्हमध्ये दिली होती. आणि परीक्षार्थींकडून घेतलेले 80 लाख रूपयांची रोख रक्कम एजंट संतोष लक्ष्मण हरकळ आणि अंकुश रामभाऊ हरकळ यांना आणून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांंनी न्यायालयात सांगितले.

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, गुन्हयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे आरोपी मुकुंदा सूर्यवंशीकडे सखोल तपास करणे आवश्यक आहे. यापूर्वी अटक केलेल्या संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ या आरोपींना परीक्षार्थींची यादी पेनड्राईव्हमध्ये दिली. ते परीक्षार्थी नक्की कोणते आहेत? त्यांची नावे अटक आरोपींकडून प्राप्त करायची आहेत. तसेच टीईटी २०१८ च्या परीक्षेमध्ये मार्क वाढविण्यासाठी परीक्षार्थी कोणामार्फत आरोपींच्या संपर्कात आले आहेत? त्यांनी कोणाच्या मार्फत सूर्यवंशीला पैसे दिलेले आहेत. एकूण किती पैसे दिले आहेत. याबाबत सखोल तपास करणे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात केला. तो ग्राहय धरीत न्यायालयाने आरोपीला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

दरम्यान, यापूर्वी जी ए. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख आणि शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरून जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विनकुमार शिवकुमार (रा. बंगळूर) याला पाच कोटी ३७ लाख रुपये देण्यात आल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणात अटक करण्यात आलेले एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलढाणा जिल्ह्यातील पाच एजंटाकडून हे पैसे जमा केले होते. त्यानंतर डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून ते शिवकुमार याला दिले. आश्विनकुमार याने टीईटी -२०१८ मधील ६०० ते ७०० परीक्षार्थींचे गुण वाढविण्यासाठी त्यास मिळालेल्या पाच कोटी रुपयांपैकी दोन कोटी जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशन याला, राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे यांना २० लाख रुपये तर शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे यास ३० लाख रुपये दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Web Title: gave a list of candidates in a pen drive 80 lakh paid to agents in tet exam scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.