गावगुंड होणार तडीपार

By admin | Published: January 25, 2016 12:59 AM2016-01-25T00:59:08+5:302016-01-25T00:59:08+5:30

विविध औद्योगिक कंपन्यांवर नाना प्रकारांनी दबाव आणणाऱ्या व दहशत निर्माण करणाऱ्या ‘ग्रुप’ व गावगुंडांना तडीपार करण्याचे आदेश शिरूर पोलिसांनी दिले आहेत.

Gavgund will be cleared | गावगुंड होणार तडीपार

गावगुंड होणार तडीपार

Next

सुनील भांडवलकर,  कोरेगाव भीमा
विविध औद्योगिक कंपन्यांवर नाना प्रकारांनी दबाव आणणाऱ्या व दहशत निर्माण करणाऱ्या ‘ग्रुप’ व गावगुंडांना तडीपार करण्याचे आदेश शिरूर पोलिसांनी दिले आहेत.
रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात कंपन्यामध्ये लेबर पुरवणे, स्क्रॅपचा ठेका व अनेक कामे मिळविण्यासाठी स्थानिक व बाहेरच्या ‘ग्रुप’च्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने या विषयाला वाचा फोडणारी वृत्तमालिका लोकमतने प्रकाशित केली. त्याची दखल घेऊन पोलिसांनी कारवाईसाठी कंबर कसली आहे.
‘ग्रुप’मध्ये सामील असणाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती काढण्यात आली असून, त्यांच्या महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ कलम २, ३, ८, १३ (एम. पी. डी. ए.) अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून, तडीपारीचेही प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले.
अशा गुंडांवर व ग्रुपवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले असल्याने शिरूर पोलिसांनी खंबीर भूमिका घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिक्रापूर व रांजणगाव पोलिसांनीही कारवाई करावी, अशी मागणी औद्योगिक क्षेत्रातून होत आहे.
कारखानदारांना निरनिराळे ग्रुप वेठीस धरतात. तसेच
गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक गावपुढारी त्रास देऊ लागल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याचे साकडे कारखानदारांच्या प्रतिनिधींनी पोलिसांना घातले आहे. अशा काही लोकांची नावेही पोलिसांना देण्यात आली आहेत. मात्र, कारवाई न झाल्याने कारखानदारांनी या गावगुंडांविरोधात मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली.

Web Title: Gavgund will be cleared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.