शिरुर - हवेली दिंडीच्या अध्यक्षपदी गव्हाणे, तर उपाध्यक्षपदी शिवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:11 AM2021-03-18T04:11:08+5:302021-03-18T04:11:08+5:30
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये पालखी रथामागे श्री शिरूर - हवेली प्रासादिक दिंडीचा २३ वा क्रमांक आहे. कोरेगाव भीमा ...
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये पालखी रथामागे श्री शिरूर - हवेली प्रासादिक दिंडीचा २३ वा क्रमांक आहे. कोरेगाव भीमा येथे संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बैठक झाली. प्रारंभी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी भाऊसाहेब गव्हाणे व हनुमंतराव शिवले यांचे एकमेव अर्ज आल्याने अध्यक्षपदी भाऊसाहेब बापूराव गव्हाणे यांची, तर उपाध्यक्षपदी ह.भ.प. हनुमंतराव बबनराव शिवले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
दिंडी सोहळा आधुनिक करण्यावर भर देणार
आषाढी वारीमध्ये शिरूर-हवेली दिंडीतील वारकऱ्यांसाठी भौतिक सुविधा देण्याबरोबरच दिंडी आधुनिक करत वारीतील वृध्दांसह महिला व तरुणांना सुख-सुविधा देत वाखारी व पिराची कुरोली येथील जागेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे दिंडीचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाऊसाहेब गव्हाणे यांनी सांगितले.
या वेळी दिंडीचे संचालक विलास खांदवे, बाळासाहेब कंद, पोपट शिवले, राजाराम गव्हाणे, दिलीप ढेरंगे, राजाराम आगरवाल, बापूसाहेब भोंडवे , रमेश भंडलकर, अनिल कंद , कांतिलाल फडतरे , राजाराम गव्हाणे, केशव फडतरे, विवेक ढेरंगे , के. डी. गव्हाणे आदी उपस्थित होते.
१७ कोरेगाव भीमा
निवडीनंतर भाऊसाहेब गव्हाणे, हनुमंतराव शिवले यांचा सत्कार करताना संचालक मंडळ .