गावठी कट्टा व २ काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:07 AM2020-12-23T04:07:55+5:302020-12-23T04:07:55+5:30
पुणे : शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कोंबिंग ऑपरेशनद्वारे कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ...
पुणे : शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कोंबिंग ऑपरेशनद्वारे कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार कोथरूडमधील डहाणूकर कॉलनी याठिकाणी
ताब्यात घेतलेल्या गुन्हेगाराकडून एक गावठी कट्टा व २ काडतुसे असा ४० हजार ८०० रूपयांचा माल हस्तगत केला.
प्रवीण बिभीषण सोनावणे (वय २२, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, डहाणूकर कॉलनी जवळ, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर अलंकार पोलीस स्टेशनमध्ये कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अंलकार पोलीस स्टेशनच्या हददीत पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस फौजदार दिपक मते व पोलीस नाईक संदीप तळेकर
यांना आरोपी बद्दल माहिती कळाली. त्याठिकाणी प्रत्यक्ष गेल्यावर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून मुददेमाल जप्त केला.