''त्या कोवळ्या फुलांचा' हुंकार ऐकणारा गझलकार अनिल कांबळे यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 08:09 PM2019-08-01T20:09:43+5:302019-08-01T20:19:49+5:30

'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी' सारखी संवेदनशील गझल लिहीणाऱ्या कवी अनिल कांबळे यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले.

Gazalkar, Poet Anil Kamble passed away | ''त्या कोवळ्या फुलांचा' हुंकार ऐकणारा गझलकार अनिल कांबळे यांचे निधन 

''त्या कोवळ्या फुलांचा' हुंकार ऐकणारा गझलकार अनिल कांबळे यांचे निधन 

googlenewsNext

पुणे : 'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी' सारखी संवेदनशील गझल लिहीणाऱ्या कवी अनिल कांबळे यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. ते ६६ वर्षांचे होते .त्यांच्या मागे पत्नी आरती व मुली प्रेरणा व प्रतिभा असा परिवार आहे. 

    अतिशय तरल, वास्तववादी आणि तितक्याच साध्या, सोप्या शब्दात आशय मांडणारे म्हणून कांबळे यांची महाराष्ट्रात ओळख होती. गझल प्रकारात सहजतेने त्यांनी मांडलेले विषय अनेकांनी गाण्यात रुपांतरीत केले. श्रीधर फडके यांनी संगीत दिलेली आणि गायलेली त्यांची 'त्या कोवळ्या फुलांचा' ही गझल विशेष गाजली. कांबळे यांनी गझलेच्या प्रचार आणि प्रसाराच्या करीता आयुष्यभर काम केले. ते युनिव्हर्सल पोएट्री फाउंडेशनचे संस्थापक होते. तसेच अभिजात कला अकादमीचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य वर्तुळावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या गाजलेल्या गझलेचा शेर खास लोकमतच्या वाचकांकरिता :

माणसे गेली तरी सावल्या उरतात मागे 

हे उन्हाचे खेळ सारे, का असे छळतात मागे 

याशिवाय त्यांची त्या कोवळ्या फुलांचा ही कविताही आवर्जून वाचावी अशीच आहे. 

त्या कोवळया फुलांचा बाजार पाहीला

पैशात भावनेचा व्यापार पाहीला मी

अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही
नजरेत वासनेचा श्रृंगार पाहीला मी

रस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतू
वस्तीतूनी दिव्यांच्या अंधार पाहीला मी

थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सूर्य ही जरासा लाचार पाहीला मी

Web Title: Gazalkar, Poet Anil Kamble passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.