मोदी सरकारच्या काळात जीडीपी दर घसरला; विश्वास उटगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:17+5:302021-06-16T04:12:17+5:30
दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘देशाची अर्थव्यवस्था अराजकतेच्या दिशेने जात आहे का?’ या ...
दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘देशाची अर्थव्यवस्था अराजकतेच्या दिशेने जात आहे का?’ या विषयावर उटगी ऑनलाईन व्याख्यानात बोलत होते. दलित स्वयंसेवक संघाचे दादासाहेब सोनवणे अध्यक्षस्थानी होते. बाळासाहेब भारस्कर, सिद्धेश्वर जाधव, लक्ष्मण लोंढे, साहेबराव खंडाळे, प्रा. धनंजय भिसे आदी या वेळी उपस्थित होते.
उटगी म्हणाले की, नोटबंदी ते जीएसटी या कालावधीत देशाची अवस्था आधीच खराब झाली. पावणेदोन लाख कोटी रुपयांच्या सवलती उद्योगपतींना दिल्या. ८० कोटी लोकांना पाच किलो धान्य फुकट देऊ म्हणतात याचाच अर्थ ८० कोटी जनता दारिद्र्यरेषेखाली गेली असा होतो. लाॅकडाऊनमुळे जनतेची क्रयशक्ती संपत आली आहे.