पोलिसांसमोर जिलेटिनची नवी डोकेदुखी

By Admin | Published: September 21, 2015 04:07 AM2015-09-21T04:07:18+5:302015-09-21T04:07:18+5:30

जिलेटिन कांड्या आणि डिटोनेटरचा वापर प्राणघातक हल्ल्यांसाठी होऊ लागल्यामुळे पोलिसांसमोर नवीन डोकेदुखी वाढली आहे. अगदी सहजतेने उपलब्ध होणारे

Gelatin's new headache in front of the police | पोलिसांसमोर जिलेटिनची नवी डोकेदुखी

पोलिसांसमोर जिलेटिनची नवी डोकेदुखी

googlenewsNext

लक्ष्मण मोरे, पुणे
जिलेटिन कांड्या आणि डिटोनेटरचा वापर प्राणघातक हल्ल्यांसाठी होऊ लागल्यामुळे पोलिसांसमोर नवीन डोकेदुखी वाढली आहे. अगदी सहजतेने उपलब्ध होणारे हे स्फोटक साहित्य आगामी काळात धोकादायक ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
गेल्या पंधरा दिवसांत जिलेटिन कांड्यांचा वापर करून मोटारसायकलच उडवून देण्याचे आखण्यात आलेले कट चिंताजनक आहेत. त्यामुळे पोलिसांना आता जिलेटिन आणि डिटोनेटरच्या वितरणावर बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे.
पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या दोन पदाधिकाऱ्यांना पोस्टाद्वारे डिटोनेटर व स्फोटके पावडर पाठवण्यात आल्याच्या दोन घटना अगदी ताज्या आहेत. या घटनांचा पोलीस तपास करत आहेत. यासोबतच ३ सप्टेंबर रोजी नारायणगावमधील नंबरवाडी येथील शेतकरी देविदास बबन काळे (वय ३०) यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. पुणे शहरामध्ये सध्या पाच तर जिल्ह्यामध्ये २० पेक्षा अधिक जिलेटीन कांड्यांचे विक्रेते आहेत. केवळ परवाना धारक वितरकांमार्फतच याची विक्री बंधनकारक असून केवळ परवानाधारक ठेकेदारांनाच याची विक्री होणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागासह शहरालगतच्या भागात दगड खाणी आहेत. या खाणींमध्ये स्फोट घडवण्यासाठी मुख्यत्वे या कांड्यांचा वापर केला जातो. परंतु विक्रेते व वितरक मोठ्या प्रमाणावर याची खरेदी करत असल्यामुळे त्याच्या विक्रीवर कोणतेही नियंत्रण राहीलेले नाही. या कांड्यांवर कोणत्याही प्रकारचे सिरीयल क्रमांक आणि त्याच्या नोंदी नसतात. त्यामुळे या कांड्यांचा वापर कसा आणि किती होतो हे तपासणे अवघड होऊन बसले आहे.

Web Title: Gelatin's new headache in front of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.