सर्वसाधारण सभेनेही फेटाळली करवाढ; थकबाकी वसुलीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:48 AM2018-02-13T03:48:54+5:302018-02-13T03:49:07+5:30

स्थायी समितीप्रमाणेच सर्वसाधारण सभेनेही प्रशासनाने पुणेकरांवर लादलेली १५ टक्के करवाढ एकमताने फेटाळली. कर वाढवण्याऐवजी थकबाकी वसुली करण्यासाठी प्रशासनाने कष्ट घ्यावेत, असे प्रशासनाला सांगण्यात आले. सत्ताधारी व विरोधातील नगरसेवकांनीही या वेळी प्रशासनावर जोरदार टीका केली.

 General Assembly also revoked; Demand for outstanding recovery | सर्वसाधारण सभेनेही फेटाळली करवाढ; थकबाकी वसुलीची मागणी

सर्वसाधारण सभेनेही फेटाळली करवाढ; थकबाकी वसुलीची मागणी

Next

पुणे : स्थायी समितीप्रमाणेच सर्वसाधारण सभेनेही प्रशासनाने पुणेकरांवर लादलेली १५ टक्के करवाढ एकमताने फेटाळली. कर वाढवण्याऐवजी थकबाकी वसुली करण्यासाठी प्रशासनाने कष्ट घ्यावेत, असे प्रशासनाला सांगण्यात आले. सत्ताधारी व विरोधातील नगरसेवकांनीही या वेळी प्रशासनावर जोरदार टीका केली.
नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी भारतीय जनता पार्टीला मते देऊन चूक केली असे पुणेकरांना वाटत असल्याचे सांगितले. सत्ता मिळाल्यापासून सातत्याने विविध गोष्टींवर थेट केंद्र, राज्य व आता महापालिकेकडूनही कर लादण्यात येत आहेत. काही लाख मिळकतींची नोंद नाही, त्यांना कर लावला जात नाही, वाढीव बांधकाम करणारे, बेकायदा उपहारगृहे, पब, बार चालवणारे यांच्यावर कारवाई केली जात नाही. प्रामाणिकपणे कर भरणाºयांचे खिसे मात्र जादा कर लावून हलके केले जात आहेत, हे चालणार नाही, असे सुतार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश कदम यांनीही प्रशासनाला
धारेवर धरले. नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी आपण नगरसेवक असतानाही आपल्या नावावर चुकीच्या पद्धतीने कर लावण्यात आला. तो दोन वेळा जमा
केला, त्यासंबधी प्रशासनाकडे चौकशी केली; पण उत्तर दिले नाही, असे सांगितले.
महेश वाबळे, अजय खेडेकर, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, भय्या जाधव, महेंद्र्र पठारे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, जयंत भावे, माजी महापौर दत्ता धनकवडे यांचीही या वेळी भाषणे झाली. सर्वांनी करवाढीला एकमताने विरोध केला व प्रशासनाने कोट्यवधी रुपयांची थकबाकी प्रथम वसूल करावी, असे सांगितले.

- स्थायी समितीने याआधीच ही करवाढ फेटाळली असल्यामुळे फारशी भाषणे झाली नाहीत, मात्र अंदाजपत्रकात तूट येण्यासाठी सर्वांनीच प्रशासनाला जबाबदार धरले. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जीएसटीमुळेच तूट आली असल्याची टीका केली.

Web Title:  General Assembly also revoked; Demand for outstanding recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे