महापालिकेची सर्वसाधारण सभा आता होणार प्रत्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:59+5:302021-09-08T04:16:59+5:30
पुणे : कोरोना आपत्तीमुळे गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेची ऑनलाईन होणारी सर्वसाधारण सभा आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत प्रत्यक्ष (ऑफलाईन) ...
पुणे : कोरोना आपत्तीमुळे गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेची ऑनलाईन होणारी सर्वसाधारण सभा आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत प्रत्यक्ष (ऑफलाईन) घेण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे आज होणारी सर्वसाधारण सभाही प्रत्यक्षात भरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोना आपत्ती कमी झाल्यावर, महापालिकेतील विरोधी पक्षांसह सर्वांनीच महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन न होता ती प्रत्यक्ष घेण्याबाबत राज्य शासनाकडे मागणी केली होती. याची दखल घेऊन मंगळवारी सायंकाळी या संबंधी ऑफलाईन मुख्यसभा घेण्याबाबतच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली असून, याची प्रत रात्री उशिरा महापालिकेस प्राप्त झाली आहे. यामुळे उद्या ( दि.८) होणारी सर्वसाधारण सभा ५० टक्के उपस्थितीत घेण्याबाबत नगर सचिव कार्यालयाने नियोजन सुरू केले आहे.