महाआॅनलाइनच्या सर्व्हरचा सावळा गोंधळ

By admin | Published: June 17, 2017 03:30 AM2017-06-17T03:30:44+5:302017-06-17T03:30:44+5:30

आॅनलाईन व्यवहारांचा आग्रह धरणाऱ्या शासनाला स्वत:चा अत्यंत महत्त्वाचा महाआॅनलाईनचा सर्व्हर तब्बल आठ दिवसांपासून दुरुस्त करणे अवघड झाले आहे.

The general mess of the Mahanline server | महाआॅनलाइनच्या सर्व्हरचा सावळा गोंधळ

महाआॅनलाइनच्या सर्व्हरचा सावळा गोंधळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आॅनलाईन व्यवहारांचा आग्रह धरणाऱ्या शासनाला स्वत:चा अत्यंत महत्त्वाचा महाआॅनलाईनचा सर्व्हर तब्बल आठ दिवसांपासून दुरुस्त करणे अवघड झाले आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
दहावी-बारावीचे निकाल लागल्याने महाविद्यालयीन प्रवेशासाठी विविध दाखल्यासाठी सध्या विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. मतब्बल आठ दिवसांपासून सर्व्हर डाऊन असूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने पालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
विद्यार्थ्यांना वेळेत दाखले देण्यासाठी व दाखले वाटपामध्ये होणारा गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाने प्रामुख्याने नॉन क्रिमीलेअर, उत्पन्न, डोमीसाईल आणि जात व अन्य दाखले आॅनलाईनच देणे बंधनकारक केले आहे. शासनाच्या सेवा हमी कायद्यानुसार अर्ज केल्यानंतर शासनाने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये दाखला देणे बंधनकारक आहे. दहावी, बारावीच्या परिक्षेचा निकाल लागल्याने विद्यार्थी व पालकांनी सेतू केंद्रांमध्ये विविध दाखल्यासाठी अर्ज करत आहेत. परंतु गेल्या आठ दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थी चांगलेच अडचणी सापडले आहेत. शासनाच्या सवलती मिळविण्यासाठी जातीच्या दाखल्याप्रमाणे उत्पन्नाचा दाखला जमा करणे गरजेचे असते. अन्यथा सवलत मिळत नाही. सर्व्हर डाऊन असल्याने मुदतीत अर्ज करून देखील दाखले मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे प्रवेशा सोबत दाखल्ये देण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी देखील शिवाजीनगर येथील सुविधा केंद्रा उपस्थित काही पालकांनी केली.

दाखलेवाटपात मोठी अडचण
पुणे जिल्ह्यात सध्या विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे दर रोज तब्बल ८ ते ९ हजार दाखले आॅनलाईन पध्दतीने दिले जाते. महिन्याला हे प्रमाण सरासरी ५९ हजार २९८ इतके आहे.
यामध्ये सर्वांधिक दाखेल पुणे शहर आणि हवेली तालुक्यात दिले जातात. परंतु सध्या महाआॅन लाईनचे सर्व्हर सतत डाऊन होत असल्याने एक दाखला डाऊन लोड होण्यासाठी अर्धा ते पाऊण तास जात आहे.
यामुळे दिवसांला पाचशे ते सहाशे दाखले देणे शक्यच नाही. गर्दीमुळे सर्वच विद्यार्थ्यांना आता दाखले वाटप करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.

काही दिवसांपासून दाखले देण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या राज्य शासनाच्या महाआॅनलाईनचा सर्व्हर सतत डाऊन होत आहे. काही तालुक्यांमध्ये तर एक-एक दिवस सर्व्हरच बंद पडत आहे. तर दहावी, बारावीच्या निकालामुळे दाखल्यासाठी येणा-या अर्जांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे शासनाने किमान विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकियाचे कालावधीसाठी आॅफ लाईन दाखले देण्यास परवानगी द्यावी,अशी लेखी मागणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
-राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी

Web Title: The general mess of the Mahanline server

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.