पुणे स्थानकावरून ८५० किलोवॅटची वीजनिर्मिती, लवकरच वीज मंडळासोबत करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:09 AM2021-05-01T04:09:37+5:302021-05-01T04:09:37+5:30
लोकमत न्युज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून लवकरच सौरऊर्जाद्वारे वीजनिर्मिती होणार आहे. फलाटाच्या कव्हर शेडवर सोलर पॅनल बसविण्याचे ...
लोकमत न्युज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून लवकरच सौरऊर्जाद्वारे वीजनिर्मिती होणार आहे. फलाटाच्या कव्हर शेडवर सोलर पॅनल बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. महिन्याला ८५० किलोवॅट वीजनिर्मिती होईल. रेल्वेने वापर करून शिल्लक राहिलेली वीज वीजमंडळास देण्यासाठी लवकरच करार देखील केला जाणार आहे.
पुणे रेल्वे स्थानक पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. पुणे रेल्वे स्थानकांच्या फलाट दोन व तीनवरील कव्हर शेडवर मोठ्या प्रमाणात सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. सोलर पॅनल बसविण्याचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.पुणेसह पिंपरी चिंचवड, शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरदेखील पॅनल बसविण्यात आले आहे. तसेच डीआरएम कार्यालयाच्या छतावर देखील सोलर पॅनल बसविले जात आहे. दर महिन्याला जवळपास ८५० किलोवॅट वीजनिर्मिती केली जाईल. पुणे रेल्वे स्थानक ग्रीन स्टेशन बनविण्याचा हा प्रयत्न आहे.
चौकट
: रुळांशेजारी बसविले जाणार सोलर
पहिल्या टप्प्यात रेल्वे स्थानकावर वीजनिर्मिती केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात रुळांशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. त्याचेदेखील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
आरईएमसी (रेल्वे एनर्जी मॅनेजमेंट कॉर्पोरेशन) या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. ही संस्था रेल्वेच्या वतीने मक्ता काढून ३५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर रेल्वेच्या जागेवर स्वतःचे सोलर पॅनल वापरून त्याद्वारे वीजनिर्मिती करणार आहे.
चौकट
अतिक्रमणाला आळा /
रेल्वेच्या अनेक मोक्याच्या जागा अतिक्रमणने गिळंकृत केल्या आहेत. अतिक्रमण काढणे म्हणजे रेल्वेची डोकेदुखी ठरली आहे. अशा जागेवर सोलर पॅनल बसवून त्या जागेचा चांगला वापर होईल. शिवाय अतिक्रमणदेखील होणार नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन देशभर हा निर्णय लागू केला आहे.