मृदू असणारे व्यक्तिमत्त्व साडेतोड होते ; प्रा. अनिरुद्ध देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:09 AM2020-12-27T04:09:22+5:302020-12-27T04:09:22+5:30

पुणे : वेडेवाकडे संकोच करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्हते. आपल्या मताशी ठाम राहणारे ते होते. विचारांवर श्रद्धा ठेवणारे ते एक ...

A gentle personality is half-hearted; Pvt. Aniruddha Deshpande | मृदू असणारे व्यक्तिमत्त्व साडेतोड होते ; प्रा. अनिरुद्ध देशपांडे

मृदू असणारे व्यक्तिमत्त्व साडेतोड होते ; प्रा. अनिरुद्ध देशपांडे

googlenewsNext

पुणे : वेडेवाकडे संकोच करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्हते. आपल्या मताशी ठाम राहणारे ते होते. विचारांवर श्रद्धा ठेवणारे ते एक श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व होते. हिंदू राष्ट्र , हिंदुत्व याची संकल्पना त्यांनी मांडली. हिंदुत्ववाचे औदार्य त्यांनी समाजापुढे मांडले. हिंदुत्व सांगण्यासाठी त्यांनी बचावात्मक भूमिका कधीही घेतली नाही. असे मृदू असणारे व्यक्तिमत्त्व सडेतोड होते, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा.स्व. संघ) अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी दिवंगत मा. गो. वैद्य यांना श्रद्धांजली वाहिली.

भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आयोजित रा. स्व. संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक, विचारवंत, लेखक, माजी आमदार मा. गो. वैद्य तथा बाबूराव वैद्य श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर संघ चालक रवींद्र वंजारवाडकर, अध्यक्ष किशोर तशीतल, कार्यवाह राजन ढवळीकर, आदी स्वयंसेवक उपस्थित होते.

प्रा. देशपांडे म्हणाले, ते व्यवहारात कर्मठ होते. हिंदुत्ववाची उकल करताना तर्क न मांडता निष्ठा मांडली. त्यांच्या विचारात स्पष्टता, परिपक्वता होती. हिंदुत्व ही धर्मनिरपेक्षतेची गॅरंटी आहे, असे त्यांनी सांगितले होते.

शंभरी गाठण्याची त्यांची इच्छा होती. ते मिश्कील स्वभावाचे होते. त्यांची जीवन गाथा असेल तर ती म्हणजे संघ आहे. वयाच्या ११ व्या वर्षापासून ते संघाशी जोडले गेले. आणखी तीन वर्षे ते जगले असते तर शंभरीचा आनंद साजरा करता आला असता. अशी खंत यावेळी देशपांडे यांनी व्यक्त केली.

Web Title: A gentle personality is half-hearted; Pvt. Aniruddha Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.