जर्मन बेकरी स्फोट प्रकरण: यासिन भटकळवर आरोप निश्चिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 02:33 AM2019-04-30T02:33:59+5:302019-04-30T06:28:57+5:30

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक आणि दहशतवादी यासीन भटकळ ऊर्फ शिवानंद याच्यावर सोमवारी पुण्यातील विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले

German Bakery blast case: Yasin Bhatkal confirms charge | जर्मन बेकरी स्फोट प्रकरण: यासिन भटकळवर आरोप निश्चिती

जर्मन बेकरी स्फोट प्रकरण: यासिन भटकळवर आरोप निश्चिती

Next

पुणे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक आणि दहशतवादी यासीन भटकळ ऊर्फ शिवानंद याच्यावर सोमवारी पुण्यातील विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले.विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली़

यासीन भटकल ऊर्फ शिवानंद (रा. भटकळ, जि़ उत्तर कन्नडा, कर्नाटक) याच्यावर देशातील विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप आहे़ त्याला ऑगस्ट २०१३ मध्ये अटक केली होती़ विविध न्यायालयात खटले सुरु असल्याने व सुरक्षेच्या कारणावरुन त्याला इतके दिवस पुण्यातील न्यायालयात हजर करता आले नव्हते़ सुरक्षेच्या कारणावरुन त्याला प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्याची परवानगी द्यावी, असे सरकार पक्षाचे म्हणणे होते़ त्याला यासीनचे वकील जहीरखान पठाण यांनी विरोध केला व त्याला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करुनच खटल्याची सुनावणी सुरु करावी, अशी मागणी अर्जाद्वारे न्यायालयात केली होती़ त्यावर १५ मे रोजी सुनावणी होणार आहे.

कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५६ जण जखमी झाले होते़ मृतांमध्ये ५ व जखमींमध्ये १० परदेशी नागरिकांचा समावेश होता. या गुन्ह्याचा तपास एटीएसने करुन त्यात मिर्झा हिमायत इनायत बेग याला ७ सप्टेंबर २०१० रोजीअटक केली होती. त्याच्यावर खटला चालविण्यात येऊन सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली होती. उच्च न्यायालयात त्याची फाशीची शिक्षा कमी करुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़ या आरोपांची झाली निश्चिती विशेष न्यायालयाचे न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात यासीन भटकळ याला सोमवार हजर केले़ त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले़ त्यानंतर सरकारपक्षाने सादर केलेल्या दोषारोपानुसार त्याच्यावर भाद वि कलम ३६०, ३०२, ३२५, ३२६, ३२४, ४२७, १२० ब, ४६७, ४६८, ४७४, १५३अ, युएपीए कायदा कलम १०, १३, १६, २१ या अंतर्गत आरोप निश्चित केले़ त्याच्यावर देशद्रोहाच्या आरोपासह कट रचणे, खूनसह बनावट कागदपत्रे तयार करणे असे आरोप ठेवले आहेत.

Web Title: German Bakery blast case: Yasin Bhatkal confirms charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.