कुटेवस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात जर्मन शेपर्ड कुत्रा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:12 AM2021-09-06T04:12:45+5:302021-09-06T04:12:45+5:30
कुटेवस्ती येथील महादेव सोनवणे यांनी आपला जर्मन शेपर्ड जातीचा कुत्रा घरासमोर बांधलेला असताना काल रात्री ( दि.४ ...
कुटेवस्ती येथील महादेव सोनवणे यांनी आपला जर्मन शेपर्ड जातीचा कुत्रा घरासमोर बांधलेला असताना काल रात्री ( दि.४ ) बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्यास ठार मारले. दरम्यान बिबट्याने कुत्र्याच्या पाठीमागच्या पायाजवळचा, गळ्यालगतचा व छातीजवळचा भाग खाल्ला आहे.
तांबेवस्ती, कुटेवस्ती परिसरात मेंढपाळ व्यावसायिकांची मोठी वस्ती आहे. या परिसरात बिबट्याला भक्ष्य म्हणून शेळ्या, मेंढ्या, गाय, कोंबड्या, बदक कुत्रे हे पाळीव प्राणी सहज उपलब्ध होतात. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी तांबेवस्ती लगत बारामाही जलसाठा असलेला आलेगाव लघुपाटबंधारा आहे. तसेच वावर करण्यासाठी दडण म्हणून शिवारात उसाची शेती आहे. त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर गेल्या पाच-सहा वर्षांपासून अधिक वाढला आहे. गेल्या पाच महिन्यांत बिबट्याने हल्ला करून पाच कुत्र्यांसह अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. दरम्यान बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे तसेच त्यांचा वावर वाढला असल्याने या भागातील शेतकरीवर्ग भयभयीत झाला आहे. शेतात काम करताना, तसेच रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना शेतकरी भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संगीता कुटे व लाला कोकरे यांनी केली आहे.
बातमीला फोटो आहे .
फोटोओळी : कुटेवस्ती ( ता.शिरूर ) येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेला जर्मन शेपर्ड जातीचा कुत्रा .
050921\img-20210904-wa0080.jpg
कुटेवस्ती ( ता.शिरूर ) बिबट्याच्या हल्ल्यात जर्मन शेपर्ड जातीचा कुत्रा ठार .