अटक कराल, तर रास्ता रोको! सणसवाडी ग्रामसभेत इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 02:58 AM2018-03-07T02:58:58+5:302018-03-07T02:58:58+5:30
कोरेगाव भीमा-सणसवाडी दंगल प्रकरणी पोलिसांनी पुन्हा अटकसत्र सुरू केल्याने संतप्त झालेल्या सणसवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी विशेष ग्रामसभा घेऊन कारवाईचा निषेध केला. तसेच, अटक सत्र न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. या कारवाईसंदर्भात मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले.
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा-सणसवाडी दंगल प्रकरणी पोलिसांनी पुन्हा अटकसत्र सुरू केल्याने संतप्त झालेल्या सणसवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी विशेष ग्रामसभा घेऊन कारवाईचा निषेध केला. तसेच, अटक सत्र न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. या कारवाईसंदर्भात मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले.
एक जानेवारीच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलिसांनी पुन्हा स्थानिक तरुणांना लक्ष्य करीत अटक सत्र सुरू केले आहे. त्यामुळे आज सणसवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात ग्रामसभा आयोजित केली. या वेळी तब्बल दोन हजार ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे, सरपंच रमेश सातपुते, उपसरपंच राहुल दरेकर, माजी सरपंच वर्षा कानडे, माजी उपसरपंच पंडित दरेकर, रांजणगाव देवस्थानचे उपाध्यक्ष अॅड. विजयराज दरेकर, बाबा दरेकर, शिवाजी दरेकर, संभाजी साठे, नामदेव दरेकर, पोलीस पाटील दत्ता माने, गणेश कानडे, गोरख भुजबळ, गोरख दरेकर, सोमनाथ दरेकर व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी शिक्रापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला.
या ग्रामसभेत ग्रामस्थ व महिलांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, स्वत:च्या घरांची, वाहनांची व्यवसायाची होणारी तोडफोड, जाळपोळ पाहत असताना संरक्षणासाठी जाणाºया तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. आम्हीच आमची घरे का पेटवू ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशाराही ग्रामस्थांनी या वेळी दिला.
...तर गाव, कारखाने बंद करू
गावाने आजवर जातीय सलोखा जपला
असूनही एकाच गुन्ह्यात दोनदोनदा नाव येत असल्याने अटकेच्या कारवाईमुळे स्थानिक तरुण भीतीच्या छायेखाली आहेत. दंगलीत पोलिसांनी मदतीला बोलावलेल्या स्थानिक तरुणांनाच आरोपीच्या पिंजºयात उभे करीत असल्याचीही
टीका या वेळी केली.
यापुढे एका जरी तरुणाला अटक करण्याची कारवाई सुरु जरी केली त्याच क्षणी गाव, कारखाने बंद करून ग्रामस्थ व महिला कुटुंबांसह रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
पोलिसांनी पुन्हा सुरू केलेल्या अटकसत्राविरोधात मंत्रालयात मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना
भेटून तारांकित प्रश्नाद्वारे बाजू मांडणार
असल्याचे सांगितले.
पोलिसांची पुरावे तपासूनच कारवाई सुरू आहे. एकाही निरपराध्यावर अद्याप कारवाई केलेली नाही. दरम्यान दुपारी शिक्रापूर पोलीस ठाण्यात सणसवाडी ग्रामस्थांची बैठक घेऊन चर्चा केली होती.
- डॉ. संदीप पखाले, अप्पर पोलीस अधीक्षक