मरगळ झडकून कामाला लागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:29+5:302021-07-16T04:09:29+5:30
शिरूर तालुक्यातील पूर्व भागात शिवसेनेचा जनसंपर्क दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना बोलत होते. ...
शिरूर तालुक्यातील पूर्व भागात शिवसेनेचा जनसंपर्क दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना बोलत होते.
राज्यात महविकास आघाडीची सत्ता आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे उध्दव ठाकरे आहेत. गेल्या दीड वर्षांत कोरोना संकट काळात अनेक महत्वाची कामे होऊ शकले नाही. त्याचबरोबर पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटीगाठी करता आल्या नाही.
शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार शिवसंपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमांतून सामान्य कार्यकर्त्याचा भेटीगाठी घेण्याबरोबरच अडी अडचणी समजून घेतल्या जात आहे. आगामी काळात प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिले जाणार असून गावोगावी नागरिकांच्या अडचणी देखील सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्ष मजबूत करण्याबरोबर आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन काम करू,संघटन वाढविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करू असे तालुकाध्यक्ष सुधीर फराटे यांनी बोलताना सांगितले.
या शिव संपर्क दौऱ्यादरम्यान रांजणगाव सांडस, न्हावरा, वडगांव रासाई, मांडवगण फराटा व परिसरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या जिल्हाध्यक्ष कटके यांनी अडचणी जाणून घेत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्फत सोडविणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक मच्छिंद्र गदादे, जिल्हा संघटक संजय देशमुख, जिल्हा सल्लागार अनिल काशिद, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, महाराज्य अल्पसंख्याक आघाडीच्या महिला अध्यक्ष रेशमा पठाण, शिरूर तालुका महिला संघटक चेतना ढमढेरे, तालुका समन्वयक सुमन वाळुंज, विधानसभा संघटक विरेंद्र शेलार,उपतालुका प्रमुख संतोष भोंडवे,उपतालुका प्रमुख रोहिदास शिवले, उपतालुका प्रमुख अनिल पवार, तालुका सल्लागार संतोष काळे, विभाग प्रमुख आनंदा ढोरजकर, उपविभाग प्रमुख भीमराव कुदळे, आबासाहेब काळे, संतोष पवळे गिरीश कोरेकर, वैभव कोकडे, दिपक कोकरे आदी यावेळी उपस्थित होते.