पेट्राेल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत अाणा अन्यथा महाराष्ट्र बंद करु : संभाजी ब्रिगेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 02:48 PM2018-05-26T14:48:20+5:302018-05-26T14:48:20+5:30

पेट्राेल - डिझेलच्या दरवाढी विराेधात संभाजी ब्रिगेडच्यावतीने झाशीची राणी चाैकात धरणे अांदाेलन करण्यात अाले.

get petrol and diesel under gst : sambhaji brigade | पेट्राेल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत अाणा अन्यथा महाराष्ट्र बंद करु : संभाजी ब्रिगेड

पेट्राेल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत अाणा अन्यथा महाराष्ट्र बंद करु : संभाजी ब्रिगेड

Next

पुणे : सरकारने पेट्राेल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत अाणून दरवाढ कमी करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड 6 जून नंतर सर्व पक्षीय महाराष्ट्र बंद करेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनाेज अाखरे यांनी दिला. संभाजी ब्रिगेड तर्फे पेट्राेल दरवाढ विराेधात झाशीची राणी चाैकात धरणे अांदाेलन करण्यात अाले त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, हवेली तालुकाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, संदिप लहाने तसेच कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. 

 अाखरे म्हणाले, देशाला अच्छे दिनाचे गाजर दाखवून सर्व सामान्य नागरिकांना नरेंद्र मोदींनी फसवलं, आणि खोटं बोलून देशाचे पंतप्रधान झाले. आज चार वर्ष झाली सरकारला. या सरकारने देशातील सामान्य नागरिकांना देशोधडीला लावले. आज महागाई, बेरोजगारीने वैतागलेल्या देशात मोदींच्या खोट्या आश्वसनाने जनतेचे कंबरडे मोडले अाहे. राज्यासह देशाचा विकास भरकटला अाहे.  आज पेट्रोल ने शंभरी गाठली अाहे तर डिझेलने पंचाहत्तरी. हेच मोदी सरकारचे चार वर्षातील अपयश आहे. सरकारने पेट्रोल व डिझेल GST मध्ये घेऊन दरवाढ कमी करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड ६ जुन नंतर सर्व पक्षीय महाराष्ट्र बंद करेल तसेच महाराष्ट्रात अांदाेलन करण्यात येईल. 

    या अांदाेलनावेळी पेट्राेल व डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ हाेत असल्याने सरकारचा निषेध करण्यात अाला. तसेच घाेषणाबाजी देखिल करण्यात अाली. त्याचबराेबर पंतप्रधानांची मन की बात बाेगस असल्याचे पेट्राेल दरवाढीने सिद्ध झाले अाहे, माेदी देशाला लुटत अाहेत. सरकारने जनतेचे हाल समजून घेत तात्काळ दरवाढ रद्द करुन पेट्राेल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत अाणावे अशी मागणीही संभाजी ब्रिगेडकडून पत्राद्वारे करण्यात अाली अाहे.

Web Title: get petrol and diesel under gst : sambhaji brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.