ढिगाऱ्याखाली अडकलेल्याची सुखरूप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 02:22 AM2018-10-02T02:22:14+5:302018-10-02T02:22:29+5:30
देशप्रेमी मित्र मंडळ : कार्यकर्त्यांनी तत्परतेने केली एकाची सुटका
कर्वेनगर : कोथरूडजवळील निंबाळकर बाग गांधी लॉन्स या ठिकाणी नाल्यामध्ये ड्रेनेजचे खोदकाम सुरू असताना दोन खोदकाम कर्मचारी मातीचा ढिगाºयाखाली गाडले गेले. देशप्रेमी मित्र मंडळ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून दोन्हीही खोदकाम कर्मचारांना सुखरूप बाहेर काढले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी बाजूची माती बाजूला करत पायाला जखमा न होता सुरक्षितपणे लहू धोत्रे (वय ३०) याला तसेच दुसºया कर्मचाºयालाही बाहेर काढले.
दोघांचा पायाला मोठी जखम झाली असून, जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाचे सतीश जगताप, राजेंद्र पायगुडे, राजेंद्र भिलारे, विठ्ठल सावंत, महेश देशमुख, हेमंत कांबळे, शुभम गोल्ह, प्रज्वल कसबे यांनी सुटका केली.
पंधरा फुटाचा पुढे खोदकाम चालू होते. असे असूनही ठेकेदाराकडून कर्मचाºयांसाठी कोणतेही सुरक्षा उपाय करण्यात आले नव्हते. तसेच खोदकाम किती फुटापर्यंत करावे याबाबत पालिकेचे काही नियम आहेत का? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, अभियंत्यांकडून कोणत्याही नियमांची माहिती दिली नाही. कामासंदर्भात किती खोल खोदकाम करावे. ते करीत असताना सुरक्षाविषय कोणत्या उपाययोजना पाळल्या ज्याव्यात याबाबत कोणत्याही नियमांचे पालन होत नसल्यामुळेच ही दुर्घटना घडली. परंतु सुदैवाने मंडळाच्या कार्यकर्ते व अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली आहे.
गांधी लॉन्सजवळील नाल्यामध्ये साधारण बारा ते पंधरा फूट ड्रेनेजचे खोदकाम सुरू असताना या खड्ड्यामध्ये दोन कर्मचारी काम करत असताना अचानक मातीचा भराव खचला आणि सर्व माती या दोन कर्मचाºयांच्या अंगावर पडली. दोघेही त्यात गळ्यापर्यंत गाडले
गेल्याने इतरांनी आरडाओरडा केला असता जवळील देशप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष मंदार बलकवडे यांनी कार्यकर्त्यांसह मदतीसाठी पुढे आले.
- राजेश जगताप, अधिकारी अग्निशमन दल