मागणी करूनही टँकर मिळेना

By admin | Published: January 6, 2016 12:48 AM2016-01-06T00:48:39+5:302016-01-06T00:48:39+5:30

इंदापूर तालुक्यातील ८ गावे व १७ वाड्यांना ८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कसलेही कारण न देता १७ ठिकाणचे टँकरचे प्रस्ताव माघारी आले आहेत.

Get a tanker even after the demand | मागणी करूनही टँकर मिळेना

मागणी करूनही टँकर मिळेना

Next

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ८ गावे व १७ वाड्यांना ८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कसलेही कारण न देता १७ ठिकाणचे टँकरचे प्रस्ताव माघारी आले आहेत.
कळंब (लोकसंख्या २ हजार ९५०), वडापुरी (४ हजार १००), शिरसटवाडी (४००), गलांडवाडी नंबर २ व विठ्ठलवाडी (१ हजार ५८), गोखळी (१ हजार २०५), खोरोची (३ हजार ३९६), वकीलवस्ती (१ हजार २५०), कवठळी (९१०) अशी टँकर सुरू असणाऱ्या गावांची नावे आहेत. तर कळंबनजीकच्या ५७ चाळ (लोकसंख्या ८९०), लालपुरी (९६०), लक्ष्मीनगर (६५०), वडापुरीनजीकच्या वेताळनगर (३५०), साठेनगर (४००), पवारवस्ती (२००), शिंदेवस्ती (२००), रामवाडी (३५०), पिंगळेवस्ती (६००), वकीलवस्तीनजीकची पांढरेवस्ती (२७५), माळशिकारेवस्ती (१६०), घोगरेवस्ती (१४०), सोपानवस्ती (४२५), कवठळीनजीकच्या खामगळवाडी (४१०), यमगरवस्ती (१४९), चोरमलेवस्ती (२१२), मारकडवस्ती (५५) या वाड्यावस्त्यांवर पाण्याचे टँकर सुरू आहेत.
एकूण २१ हजार ६९५ लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यापैकी गावठाणातील लोकसंख्या १४ हजार २११ तर वाड्या-वस्त्यांवरील लोकसंख्या ७ हजार ४८४ एवढी आहे.
बिजवडी, निमसाखर, कडबनवाडी, सुरवड, चाकाटी, कचरवाडी (बावडा), बावडा, झगडेवाडी, तरंगवाडी, भोडणी, दगडवाडी, घोरपडवाडी, व्याहळी, निमगाव केतकी, कचरवाडी (निमगाव केतकी), वायसेवाडी (अकोले), शेटफळगढे, पिटकेश्वर, काझड या १९ गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आले होते. ते काहीही लिखित कारण न देता परत पाठवण्यात आले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Get a tanker even after the demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.