भीती न बाळगता कोरोना लसीकरण करुन घ्या : रमा जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:10 AM2021-04-28T04:10:39+5:302021-04-28T04:10:39+5:30

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील अत्यंत डोंगर, दर्‍या-खोर्‍यांमध्ये असणारी गावे कोरोना हाॅटस्पाॅट झाली आहेत. या गावांपैकी शिनोली, तळेघर, जांभोरी, राजपूर, ...

Get vaccinated without fear: Rama Joshi | भीती न बाळगता कोरोना लसीकरण करुन घ्या : रमा जोशी

भीती न बाळगता कोरोना लसीकरण करुन घ्या : रमा जोशी

Next

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील अत्यंत डोंगर, दर्‍या-खोर्‍यांमध्ये असणारी गावे कोरोना हाॅटस्पाॅट झाली आहेत. या गावांपैकी शिनोली, तळेघर, जांभोरी, राजपूर, म्हातारबाचीवाडी या गावांमध्ये तालुक्याच्या तहसिलदार रमा जोशी यांनी प्रत्यक्ष जाऊन संबंधित पोलीस पाटील, ग्रामस्थ व होम क्वारंटाईन असलेल्या रुग्ण यांच्याशी संवाद साधत कोरोना ह्या महामारीबाबत नियम व अटींबाबत सूचना केल्या. त्याचप्रमाणे तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्र जांभोरी उपकेंद्र ह्या लसीकरण केद्रांचीही पाहणी केली. रोगराई व संसर्गापासून नेहमी दूर असलेल्या तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील दोन आठवड्यांपासुन आदिवासी भागातील अत्यंत डोंगर दर्‍यांमध्ये असलेल्या गावे त्याचप्रमाणे वाड्या-वस्त्यांवर कोरोना ह्या महामारीने शिरकाव करुन थैमान घातले आहे. यामध्ये तळेघर प्राथमिक केंद्रार्तंगत असलेले कोंढवळ १६ रुग्ण, म्हातारबाचीवाडी ५ रुग्ण, तेरुंगण ८ रुग्ण, राजपुर / गाडेवाडी २६ रुग्ण, तळेघर ३९ रुग्ण, फलोदे ११ रुग्ण, जांभोरी २८ रुग्ण, चिखली ६ रुग्ण, पोखरी २७ रुग्ण, सावरली ३ रुग्ण, दिगध १ रुग्ण, कुशिरे बु. १६ रुग्ण, पाटण ३ रुग्ण, साकेरी १ रुग्ण, पिंपरी २ रुग्ण, भीमाशंकर १ रुग्ण असे एकूण आज अखेर १९४ रुग्ण आढळले आहेत. या पैकी काही रुग्ण अवसरी व शिनोली येथील कोविड सेंटरमध्ये दाखल असून काही रुग्ण होम क्वारंटाईन झाले आहेत. या अनुषंगाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊची गरज, महत्व, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्क वापर याबाबत जनजागृती करा. होम आयसोलेशनमध्ये असणार्‍या रुग्णांनी घराबाहेर पडु नये. आपल्या पासून इतरांना त्रास होणार नाही, ह्याची दक्षता घ्यावी. अशा कडक सूचनाही तहसिलदार जोशी यांनी केल्या. या वेळी तलाठी दिपक हरण, अजित लांडे, उपस्थित होते.

फोटो ईमेल करत आहे

फोटो खालचा मजकुर:-आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असणार्‍या लसीकरण केंद्रास तालुक्याच्या तहसिलदार रमा जोशी यांनी भेट दिली.

तळेघर वार्ताहार

संतोष जाधव

Web Title: Get vaccinated without fear: Rama Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.