सर्वाधिक बस मार्गावर आणणार
By admin | Published: April 17, 2017 06:29 AM2017-04-17T06:29:56+5:302017-04-17T06:29:56+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मालकीच्या असलेल्यापैकी किमान ९०० बस येत्या ३० एप्रिलपर्यंत मार्गावर आणण्याच्या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने तयार सुरू केली आहे.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मालकीच्या असलेल्यापैकी किमान ९०० बस येत्या ३० एप्रिलपर्यंत मार्गावर आणण्याच्या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने तयार सुरू केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रात्रपाळीचे काम दिल्यानंतर आता पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांनासुद्धा जागते राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अधिकारी देखील आता काही काळासाठी डेपोंमध्ये राहणार असून, तेथील कामाचा आढावा घेणार आहेत.
पीएमपीच्या मालकीच्या १२०० बस असून, त्यापैकी सुमारे दररोज ७०० ते ७५० बस मार्गावर असतात़ पीएमपी प्रशासनाने १६ ते ३० एप्रिल दरम्यान विशेष मोहीम हाती घेतली असून, या काळात मालकीच्या किमान ९०० बस मार्गावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे महाव्यवस्थापक, वाहतूक व्यवस्थापक, मुख्य अभियंता, कामगार अभियंता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, झोनल व्यवस्थापक यांनी आठवड्यातून एकदा आणि आगार व्यवस्थापक व यांत्रिकी अभियंत्याने किमान दोनदा डेपोंना रात्री ११ ते १ दरम्यान भेट द्यावी. सर्व डीएमई, डेपो इंजिनियर यांनी डेपोत रात्रपाळी ८ ते ४ किंवा १० ते ६ या वेळेत करावी आणि बसेसची देखभाल दुरुस्ती करून जास्तीत जास्त गाड्या मार्गस्थ कराव्यात, असेही आदेश आहेत.