गिझर दुरुस्ती पडली पाच लाखाला, ऑनलाईन ॲपद्वारे महिलेच्या नावे परस्पर कर्ज
By रोशन मोरे | Updated: September 18, 2023 17:06 IST2023-09-18T17:05:57+5:302023-09-18T17:06:26+5:30
महिलेच्या नावावर परस्पर कर्ज काढून पाच लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली...

गिझर दुरुस्ती पडली पाच लाखाला, ऑनलाईन ॲपद्वारे महिलेच्या नावे परस्पर कर्ज
पिंपरी : गिझर दुरुस्ती करण्यासाठी महिलेने फोन केला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने तो गिझर कंपनीचा माणूस असल्याचे भासवून महिलेला एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या ॲपद्वारे महिलेच्या बँक खात्यातील पैसे काढून घेतले. तसेच महिलेच्या नावावर परस्पर कर्ज काढून पाच लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना सोमवारी (दि.११) हिंजवडी येथे घडली.
या प्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि.१७) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी महिलेशी फोनवर बोलणाऱ्या संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्या घरातील गिझर खराब झाला. तो दुरुस्त करण्यासाठी महिलेच्या सासऱ्याने संबंधित गिझरची कंपनीचा नंबर गुगलवर शोधला. गुगलवर मिळालेल्या नंबरवर महिलेने फोन केला असता फोन उचलणाऱ्या व्यक्तीने तो कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवले. तसेच महिलेला एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या ॲपद्वारे महिलेच्या बँक खात्यातून प्रथम ९१ हजार ६५ रुपये नंतर एक हजार नऊशे ५० रुपये काढून घेतले. तसेच महिलेच्या नावावर परस्पर ऑनलाईन पद्धतीने एक लाख ४७ हजार रुपयांचे कर्ज घेतले.