पुण्यात हेल्मेटसक्ती विरोधात घंटानाद आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 01:28 PM2019-02-01T13:28:32+5:302019-02-01T14:49:14+5:30

पुण्यात हेल्मेटसक्ती लागू झाल्यापासून पुणेकरांचे हाल होत आहेत.

ghantanaad movement against helmets compulsary in Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती विरोधात घंटानाद आंदोलन 

पुण्यात हेल्मेटसक्ती विरोधात घंटानाद आंदोलन 

Next

पुणे: रद्द करा रद्द करा ,हेल्मेट सक्ती रद्द करा, पुणेकरांच्या मानगुटीवर बसणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, पुणेकरांच्या एकजुटीचा विजय असो , तुम्ही लावा कितीही शक्ती आम्हाला नको हेल्मेट सक्ती,  पालकमंत्री जागे व्हा अशा घोषणा देत हेल्मेट सक्ती विरोधी कृती समिती पुणे यांनी मंडई टिळक पुतळा येथे घंटानाद आंदोलन केले. यावेळी माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरातवाला, नगरसेवक संदीप खर्डेकर, रवींद्र माळवदकर, माजी नगरसेवक शाम देशपांडे, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, बाळासाहेब दाभेकर, शिवसेना कसबा विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे, काँग्रेस नेत्या डॉ सुनिता पवार, मंदार जोशी, अखिल ब्राम्हण महासंघ अध्यक्ष आनंद दवे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आदी उपस्थित होते. 
पुण्यात हेल्मेटसक्ती लागू झाल्यापासून पुणेकरांचे हाल होत आहेत. एखाद्या माणसाचे उत्पन्न दिवसाला तीनशे रुपये असेल तर तो पाचशे रुपये दंड भरत आहे. पुण्यातील रस्ते लहान असून वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. 
या समितीने आंदोलनात हेल्मेट सक्ती रद्द करावी यासाठी आंदोलन केले. हेल्मेटसक्तीने पुणेकरांचे हाल शासन मात्र मालामाल, हेल्मेट सक्ती हटाव पुणेकर बचाव, हेल्मेट उत्पादकांचे हिट साधणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो अशा पताका दाखवून हेल्मेटसक्ती विरोधात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
भाजपा आमदार कुठ गेले. ते आता काही बोलत नाहीत. निवडणुकीच्या वेळी मत मागायला येतात. पोलिसांनी ही सक्ती करू नये. पुणेकरांचा मानगुटीवर बसवून लूट होत आहे. अशा विचार पुणेकर नागरिकांनी यावेळी मांडले. 
कृती समितीचे पदाधिकारी म्हणाले, हजारो तरुण आणि पुणेकरांनी सांगितलं की आम्हाला हेल्मेटसक्ती नको. पुणेकरांच्या जीवाची काळजी असेल तर गुन्हेगारी, तोडफोड होत आहे त्यावर कारवाई करा. अनेक संघटना कृती समितीच्या पाठिंबा दिला आहे.

............

हेल्मेटसक्ती कृती विरोधी समिती आणि आमदार मेधा कुलकर्णी दोघांमध्ये खडाजंगी.
कृती समितीचे सदस्य घंटा आंदोलनात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात घोषणा देत होते. मेधा कुलकर्णी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्याठिकाणी आल्या होत्या. त्यावेळी आमदार कुलकर्णी म्हणाल्या, गिरीश बापट यांच्याबद्दल घोषणाबाजी करू नका. हा न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामध्ये पालकमंत्र्यांची काही चूक नाही. या वक्तव्यावरून कृती समिती आणि मेधा कुलकर्णी यांच्यात  खडाजंगी झाली. 

Web Title: ghantanaad movement against helmets compulsary in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.