आंबिल ओढा वळवण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:48+5:302021-06-17T04:08:48+5:30
पुणे : आंबिल ओढा झोपडपट्टीच्या पुनर्वसन प्रकल्पात विकसक आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण याकडून स्थानिकांची दिशाभूल आणि अपारदर्शक काम चालू ...
पुणे : आंबिल ओढा झोपडपट्टीच्या पुनर्वसन प्रकल्पात विकसक आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण याकडून स्थानिकांची दिशाभूल आणि अपारदर्शक काम चालू असल्यामुळे महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तसेच विकसक यांच्या वस्ती दौऱ्यावर आंबिल ओढा झोपडपट्टीतील नागरिकांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला.
बहुजन एकता परिषदेचे किशोर कांबळे यांनी सांगितले की, आंबिल ओढा झोपडपट्टी हा फायनल प्लॉट क्र २८ हा पुणे मनपाच्या मालकीचा असून अजून तो विकसकास हस्तांतरित केलेला नाही. झोपडपट्टीधारकांना वेगळेपणाने घरे खाली करून घ्यायचा प्रताप चालू आहे. प्रशासनाकडून आंबिल ओढा वळवण्याचा घाट घालून शेकडो कुटुंबाना बेघर करण्याचे कारस्थान इथे रचले जात आहे.
आंबीिल ओढा नागरी कृती समितीच्या माध्यमातून लोकांनी आयुक्त, आणि प्रशासनास घेराव घालून चुकीचे दिशाभूल करणारे काम थांबवा आणि सर्वाना विश्वासात घेऊनच काम करा, तसेच विकास करताना कुठेही पर्यावरणाची हानी होऊ नये याची काळजी घेण्याची विनंती करण्यात आली. कृती समितीचे सिध्दार्थ दिवे, हनुमंत फडके, तानाजी लोहकरे, किरण सोमवंशी, सागर ढावरे, पुरुषोत्तम ओहाळ यांनी झोपडपट्टी धारकांचे प्रश्न मांडले.