घाटपांडे, नेवासकर यांचा निर्णय २६ जुलैला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 04:09 AM2018-07-17T04:09:31+5:302018-07-17T04:09:33+5:30
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे, अभियंता राजीव नेवासकर यांच्या जामिनावरील सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.
Next
पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे, अभियंता राजीव नेवासकर यांच्या जामिनावरील सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. सोमवारी (१६ जुलै) दोघांच्या जामिनावर सुनावणी होणार होती. मात्र न्यायालय सुटीवर असल्याने निकालाची सुनावणी २६ जुलैला होणार आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. दोघांना जामीन देण्याची मागणी बचाव पक्षाने केली आहे. तर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी जामिनाला विरोध केला आहे.