वेल्ह्यातील घोमदांडवस्ती, टाकेवस्ती एक महिन्यापासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:10 AM2021-03-28T04:10:06+5:302021-03-28T04:10:06+5:30
पानशेत परिसरातील टेकपोळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत घोमदांड वस्ती, टाकेवस्ती, पानशेत ते या वस्तींचे अंतर ४६ किलोमीटर या वस्त्यांवर ...
पानशेत परिसरातील टेकपोळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत घोमदांड वस्ती, टाकेवस्ती, पानशेत ते या वस्तींचे अंतर ४६ किलोमीटर या वस्त्यांवर दहा ते बारा घरे असून या ठिकाणी चाळीस ते पन्नास नागरिक राहतात. या वस्तीवरील महावितरणचे विजेचे खांब पडले असून गेल्या महिन्यापासून या ठिकाणी लाईट नसल्याने येथील नागरिकांचे मोठे हाल चालले असून पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिलांना दोन ते तीन किलोमीटर पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात वणवण फिरावे लागत असून येथील जनावरांचेसुध्दा मोठे हाल होत आहेत.
याबाबत संबधित विभागाला वारंवार कळवूनही दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांनी या परिसरातील सामाजिक कार्येकते अजिंक्य पोळेकर यांच्याशी संपर्क साधला. याठिकाणी २३ मार्च रोजी पोळेकर यांच्यासह सागर पोळेकर, आशिष उत्तेकर, सचिन मोरे, किरण पोळेकर यांनी या परिसराची पाहणी करत नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन संबधित महिला नागरिकांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.
--
कोट येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून नागरिकांसह, जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल
होत आहेत. - अजिंक्य पोळेकर, सामाजिक कार्यकर्ते
--
कोट
विजेच्या खांबाला जेसीबीची धडक बसल्याने विद्युत प्रवाह बंद पडला असून दोन दिवसांतच या ठिकाणचा विद्युत प्रवाह चालू होईल. - अभिजित भोसले, महावितरण अधिकारी
--
फोटो क्रमांक : २७ मार्गासनी वीज पुरवठा खंडित फोटोसाठी ओळ- टाकेवस्ती (ता. वेल्हे) येथील विद्युत पोल वाकल्यामुळे विद्युत प्रवाह बंद असलेला दाखविताना येथील महिला व सोबत अजिंक्य पोळेकर.