पिंपळगाव येथे घोड नदी स्वच्छतेचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:09 AM2021-05-24T04:09:26+5:302021-05-24T04:09:26+5:30
नद्यांचे प्रदूषण हा काही नवीन विषय नाही. अतिक्रमणापासून ते जलप्रदूषणाच्या विळख्यात नद्या अडकल्या आहेत. त्याला घोड नदीदेखील अपवाद नाही. ...
नद्यांचे प्रदूषण हा काही नवीन विषय नाही. अतिक्रमणापासून ते जलप्रदूषणाच्या विळख्यात नद्या अडकल्या आहेत. त्याला घोड नदीदेखील अपवाद नाही. मलमूत्रमिश्रित पाणी आणि उद्योगांमधील प्रदूषित पाणी घोड नदीत सोडले जात आहे. नदीजवळून गेल्यावर तोंडनाक दाबून जावे लागते, इतकी दुर्गंधी निर्माण झाली आहे. पाण्यात मासे जगत नाहीत. माणसे, जनावरे हे पाणी वापरू शकत नाही. या क्षारयुक्त पाण्यामुळे शेतीपिकांचे उत्पन्न घटले आहे. लोकांना पोट, सर्दी, खोकला आणि किडनीचे आजार जडले आहेत. याचा गांभीर्याने विचार करून बलुतेदार सामाजिक संस्थेने घोड नदी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे.
पिंपळगाव परिसरातील घोड नदीपात्रातील शेवाळ आणि नदीपात्रात साचलेली घाण संस्थेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी काढली आहे. संस्थेचे अध्यक्ष आकाश जुन्नरकर, सचिव संदीप वाघ, खजिनदार नितीन बारवकर, कार्याध्यक्ष मधुकर वाघमारे, राजेंद्र वाघ, राजेंद्र राजगुरू, आनंद वाघ, सतीश वाघ, नीलेश बांगर आदींनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
२३ मंचर घोड नदी