घोड नदीने गाठला तळ, तर भीमा नदीला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:09 AM2021-07-26T04:09:08+5:302021-07-26T04:09:08+5:30
या भागात समाधानकारक पाऊस देखील झालेला नाही, परंतु धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणातील विसर्ग हा नदीत सोडल्याने ...
या भागात समाधानकारक पाऊस देखील झालेला नाही, परंतु धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणातील विसर्ग हा नदीत सोडल्याने मुळा मुठा भीमा नदी यांनी रुद्र रूप धारण केलेले आहे . नद्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना त्याचा फटका बसलेला आहे कारण नदीला पूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपले वीजपंप काढून सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. ट्रान्सफॉर्मर पाण्यात आहे .वीज प्रवाह सुरू करता येते नाही .मोटार स्टार्टर खराब झाले आहेत. वीज पंप खोलून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना विज पंपही जोडता येत नाही कारण पाण्याचा प्रवाह हा कमी-जास्त होत आहे. नदीला पुराचा प्रवाह पाणी कमीजास्त होत असल्यामुळे वीज पंप जोडावी किंवा न जोडावी अशी शेतकऱ्यांची द्विधा स्थिती झालेली आहे. त्यातच पूर्व भागात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पिकेही सूकू लागलेल्या स्थितीत आहे. म्हणजेच नद्या दुथडी भरून वाहत आहे व नदी काठावरील शेती तहानलेली आहे. परंतु शेतीला पाणी शेतकऱ्यांना देता येत नाही त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडावा, अशी शेतकऱ्यांना आशा लागून राहिलेली आहे.
फोटो ओळ शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील घोड नदीचे पात्र अद्यापही रिकामेच आहे तर भीमा नदीही दुथडी भरून वाहत आहे. एकाच तालुक्यातील दोन नद्यांचे वेगवेगळे चित्र छायाचित्र तुकाराम पठारे.