घोडेगाव पोलिसांची कारवाई, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:14 AM2021-09-14T04:14:16+5:302021-09-14T04:14:16+5:30
कारवाई करत त्यांच्याकडून ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये वाईन शॉपमधून दारू विकणाऱ्या दुकानदारासह चार ...
कारवाई करत त्यांच्याकडून ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये वाईन शॉपमधून दारू विकणाऱ्या दुकानदारासह चार जणांवर गुन्हा दाखल
करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.
अशिष बबन पादरे (वय ३१), उत्तम धोंडूशेट पादरे (सर्व रा. सदा बाजार पेठ, जुन्नर), विठ्ठल धर्मा पारधी (वय ३३, रा. गोळेगाव, जुन्नर) या तीन व्यक्तींसह दारू विकणाऱ्या जे. के. वाईन्स घोडेगाव येथील दुकानमालकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची तक्रार घोडेगाव पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अतिश काळे यांनी दिली आहे. घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूबाबत आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असून जे शासन मान्य दारू विक्री करणारे दुकानदार आहेत, त्यांनी चुकीच्या मार्गाने दारूविक्री करून नये, अन्यथा त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येईल असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिला आहे.